वाशिम- दि.११ जानेवारी
पोलिसांच्या बाजूने लढणारी संघटना पोलीस बॉईज असोसिएशन च्या जिल्ह्या स्तरीय बैठकीचे आयोजन दि 11 जानेवारी गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक हॉटेल वाशिमकर येथे करण्यात आले होते.संघटनेत सामील होऊ इच्छिणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांनी केले होते या अनूषंगाने
महाराष्ट्रात मजबूत संघटन असलेल्या पोलीस बॉईस असोसिएशन ने पोलिसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे .सदर बैठकीत संघटनेची नवीन दिशा ठरविली असून जिल्हा कार्यकारणी सह वाशिम, मालेगाव,रिसोड, मंगरूळपीर, मानोरा ,कारंजा तालुका अध्यक्षांची निवड सुध्दा यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस बाॅईज असोशियशन वाशिम जिल्हा ऊपाध्यक्षपदी फुलचंद भगत यांची जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांनी नियूक्तीपञ देवून नियुक्ती करन्यात आली असुन जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.या कार्यकारीणी निवड सभेला वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातुन पोलिस बाॅईजची बहूसंख्य ऊपस्थीती होती.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा