मंगरुळपीर-अनू.जाती मूलांची शासकीय निवासी शाळा तुळजापुर मंगरुळपीर येथे दि.१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आणी स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करन्यात आली.
स्वराज्य संस्थापक यांची जननी,राजमाता जिजामाता तसेच युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती येथील अनू.जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत ऊत्साहात साजरी करन्यात आली तर स्वराज्याची स्थापना करणारे छञपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे धडे व बाळकडु पाजणार्या राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर मान्यवरांनी प्रकाश टाकुन युवकामधे चेतना जागृत करणारे आणी आपली शक्ती विधायक कामाला खर्ची घालन्याचा मौलीक संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला रविंद्र चव्हाण,फुलचंद भगत,संदिप सातपुते,कोमल मेश्राम,राष्टपाल आडोळे,सुमेध चक्रनारायन,गुलाब घरडे आदी शिक्षकासह विद्यार्थ्यांनी ऊपस्थीती होती.
सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा