गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

पोलीस बॉईज असोसिएशन वाशिम जिल्हा कार्यकारणी घोषित



वाशिम- 
पोलीस बॉईज असोसिएशन चे  संस्थापक अध्यक्ष रवीभाऊ वैध यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांनी वाशिम येथील हॉटेल वाशिमकर येथे आयोजित जिल्ह्यास्तरीय बैठकीत वाशिम तालुका अध्यक्षसह  जिल्हा कार्यकारणी जाहीर केली 
हॉटेल वाशिमकर येथे विनोद तायडे  यांच्या अध्यक्षतेखाली  पोलीस बॉईज असोसिएशन  जिल्हास्तरीय  आयोजित बैठकीत विनोद तायडे यांनी तालुका अध्यक्षासह जिल्हा कार्यकारणी जाहीर केली 
वाशिम जिल्हा उपाध्यक्षपदी फुलचंद भगत,ज्ञानेश्वर देशमुख, जिल्हा सरचिटणीस महादेव हरणे, जिल्हा कोषाध्यक्ष विनोद नंदागवळी, सह कोषाध्यक्ष पंजाबराव घुगे,वाशिम तालुकाध्यक्ष  सुरेश इंगोले, कारंजा तालुकाध्यक्ष नरेंद्र  बोरकर,मंगरूळपीर तालुकाध्यक्ष गजानन मोरे,  मानोरा तालुकाध्यक्ष मुन्शीराम उपाध्ये ,रिसोड तालुकाध्यक्ष  पंकज बगडीया,रिसोड शहराध्यक्ष राहुल जुमडे आदींची निवड करण्यात आली विनोद तायडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकाऱ्यासह तालुकाध्यक्षाना नियुक्तीपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलचंद भगत तर आभार महादेव हरणे यांनी मानले बैठकीला बहुसंख्य पोलीस बॉईज यांची उपस्थिती लाभली 
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा