गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

पोलीस बॉईस असोसिएशन वाशिम जिल्हा सरचिटणीस पदी महादेव हरणे यांची निवड


वाशिम- दि.११   वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा  येथील युवा पत्रकार तथा साप्ताहिक सम्राट टाईम्स चे कार्यकारी संपादक महादेव हरणे  यांची पोलीस बॉईज असोसिएशन च्या वाशिम जिल्हा सरचिटणीस पदी  निवड करण्यात आली आहे  वाशिम जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या हस्ते वाशिमकर हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात महादेव हरणे  यांना  नियुक्ती पत्र देण्यात आले.  
पोलिसांच्या बाजूने लढणारी संघटना पोलीस बॉईज असोसिएशन च्या जिल्ह्या स्तरीय बैठकीचे आयोजन दि 11/01/2018 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक हॉटेल वाशिमकर येथे करण्यात आले होते  . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद तायडे यांची उपस्थिती होती. 
महाराष्ट्रात मजबूत संघटन असलेल्या पोलीस बॉईस असोसिएशन ने पोलिसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत  आहे .सदर  बैठकीत संघटनेची नवीन दिशा ठरविण्यात आली .  जिल्हा कार्यकारणी सह वाशिम, मालेगाव,रिसोड, मंगरूळपीर, मानोरा ,कारंजा तालुका अध्यक्षांची निवड  करण्यात आली सदर कार्यकारीणी निवड बैठकीला शेकडो  पोलीस बॉईज ची उपस्थिती लाभली  होती.

सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा