रविवार, १० डिसेंबर, २०१७

*वाशिम जिल्हा मध्ये औषध विक्रेता प्रशिक्षण शिबिर संपन्न*



वाशिम:

ता.१० अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र, विभाग अकोला वाशिम व वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.यांच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर ला वाशिम जिल्हा मध्ये किरकोळ व घाऊक परवानाधारक औषधी विक्रेत्याकरिता कायदेशीर बाबींचे प्रशिक्षण येथे संपन्न झाला.या शिबिरात अन्न व औषध प्रशासन  सहायक आयुक्त मा.डॉ प्रशांत अस्वार साहेब यांनी ड्रग अँड कॉस्मेटिक अक्ट १९४०,डी पि सी ओ २०१३ तशेच एन. पि.पि.ए. तील तरतुदी एन. डी.पि.एस. अक्ट १९८५,फूड सेफ्टी स्टॅंडर्ड अक्ट २००६,या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आले.कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी  राजेशजी पाटील हे होते तर प्रमुख ऊपस्थिती मध्ये जिल्हा व आ.झोन सचिव नंदकिशोरजी झंवर,उपअध्यक्ष विजयजी ठाकरे,ऊत्कर्षजी राऊळ,कोषअध्यक्ष विशालजी मिशाळ, सहसचिव हरीशजी लाहोटी,वकारभाई अकोला, संघटण सचिव नंदकिशोरजी अग्रवाल,किशनरावजी मस्के,नवनीतजी डांगुर, पांढरे सर,रोहीदासजी चव्हाण हे होते सहाही तालुक्यातील औषधी विक्रेते खुप मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन वाशिम जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट सहसचिव प्रदीपजी नागे,कैलाजी जाजु यांनी केले.तर आभार प्रदर्शन हरिभाऊजी खोडके,अमोलजी सोनवने, आनंदजी टांक,कपिलजी राठोड, गिरीषजी बाहेती,आशिषजी बंड यांनी केले.कार्यक्रमाची सांगता अल्पोहर देऊन करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व जिल्हा व ता.पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले कार्यशाळे मध्ये सहभागी सर्वांचे आभार जिल्हा पदाधीकारी यांच्याकडुन मानण्यात आले.

सम्राट टाईम्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा