बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

डॉ. लिंबाजी गाभणे अनंतात विलीन


वाशिम येथील सुप्रसिध्द डॉ. श्याम गाभणे माजी आरोग्य व शिक्षण सभापती जि.प.वाशिम यांचे वडील डॉ लिंबाजीराव गाभणे यांचे  आज दि.२७/१२/२०१७ रोज बुधवारला वृद्धापकाळाने निधन झाले . तरी त्यांचा अंत्यसंस्काराच्या कार्यक्रम उद्या दि २८डिसेंबर २०१७ रोज गुरुवारला सकाळी १० वाजता   शिरपूर येथे आहे.डॉ. लिंबाजीराव गाभने ह्यांनी मालेगाव, शिरपूर आणि वाशीम परिसरातील ग्रामीण भागात राहून आयुष्यभर, ग्रामीण जनतेला योग्य आणि रास्त  आरोग्य सेवा दिली.
त्याबरोबरच राजकारण आणि समाजकारण द्वारे त्या विभागातील सर्वाना मदत केली.त्याबरोबरच, शिक्षण संस्थांची स्थापना करून ग्रामीण भागातील गरीब जनतेला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
तसेच कुटुंबातील मुला मुलींना, नातवंडांना उच्च विद्या विभूषित करून आरोग्य आणि सामाजिक सेवेचा वसा पुढे सुरू ठेवला.त्यांचे कार्य ही मुले चांगल्या प्रकारे सुरू ठेवतील, हे निश्चित.डॉ साहेबांच्या आत्म्यास शांती मिळो, तसेच
गाभने कुटुंबियांवर झालेल्या आघातातून सर्व कुटुंबीय, आप्त परिवार आणि मित्र मंडळींना सावरण्याची शक्ती मिळो; हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तसेच डॉ. साहेबाच्या निधनाने गाभने परिवारासोबतच शिरपुर वासियावर शोककळा पसरली आहे.

सम्राट टाइम्स 
सतीश गाभणे
पिंप्री सरहद्द
मो.९५११४२०३३३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा