जिल्ह्यात तीन हजार घरकुलांना मंजुरी
सम्राट टाइम्स न्यूज
दिनांक: 1/12/17
रमाई आवास योजनेचे सन 2017-18 या वर्षात जिल्ह्यात तीन हजार घरकुलाचे उद्दिष्ट मंजुर झाले असुन यासाठी पात्र लाभार्थ्यांनी नी 15 डिसेंबर पर्यंत
पंचायत समिती मध्ये प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी
अधिकारी तथा जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे कार्यकारी अध्यक्ष गणेश
पाटील यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकानुसार अनुसुचित जाती व नवबौध्द
प्रवर्गातील घर नसलेल्या व कच्चे घर असलेल्या कुटुंबांनी घरकुल
बांधण्याकरीता शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी
जिल्ह्यात एकुण तीन हजार घरकुलाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे
उद्दीष्ट कुटुंब संख्येच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यांना वेगवेगळे असुन
यासाठी पंचायत समितीस्तरावर दिनांक 15 डिसेंबर पर्यंत थेट
लाभाथ्र्यांमार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. पंचायत समिती स्तरावर
प्राप्त अर्ज दि. 16 ते 24 डिसेंबर पर्यंत पडताळणीकरीता
ग्रामसेवकांमार्फत संबंधित ग्रामपंचायतीला पाठविण्यात येणार आहेत.
ग्रामसेवक, मिनी बीडीओ व विस्तार अधिकारी (सर्व) हे प्रस्तावाची पडताळणी
करतील. पडताळणी नंतर 25 डिसेंबरला ग्रामपंचायतीमध्ये पात्र व अपात्र
लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत कुणाच्या काही
हरकती असल्यास पुढील दोन दिवसात म्हणजे दि. 26 व 27 डिसेंबर दरम्यान
नागरिकांना आपल्या हरकती, आक्षेप नोंदविता येणार आहेत. त्यानंतर 28, 29 व
30 डिसेंबर ला विशेष ग्रामसभेची मान्यता घेऊन बीडीओ कडे पाठवावी.
गटविकास अधिकाज्यांनी पडताळणी करुन 5 जानेवारी 2018 पर्यंत अंतिम यादि
घरकुल निर्माण समितीकडे सादर करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश पाटील यांनी दिले आहेत.
पंचायत समिती वाशिम मालेगाव रिसोड मंगरुळपीर मानोरा कारंजा
घरकुल दद्दिष्ट 553 565 606 522 303 451
घरकुलासाठी कोणी अर्ज करावा?
रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी खालील पात्र व्यÜक्तनी अर्ज करावा.
महाराष्ट्र राज्यातील अनु. जाती व नवबौध्द घटकातील व्यक्ति.
किमान 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असावे.
घर नसलेली किंवा कच्चे घर असलेली व्यक्ति.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.1 लक्ष.
सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 च्या प्राधान्य क्रम यादीच्या
निकषाबाहेरील व्यक्ति.
संबंधित लाभार्थी हा ग्रामसभेने निवडलेला असावा.
अपंग व्यक्तींना तीन टक्के राखीव प्रमाणे घरकुलाचा लाभ देण्यात येणार.
याबाबतचे छापील अर्ज पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे मिळतील.
घरकुलासाठी अर्ज करणारे लाभार्थी हे गरीब व मागासवर्गीय गटातील असतात.
अशा घटकांना सामाजिक बांधिलकी म्हणुन घरकुल देण्याची शासनाची भुमिका
आहे.त्यामुळे घरकुल मंजुरीसाठी कोणत्याही व्यक्तिने पौशाची मागणी केल्यास
लाभार्थ्यांनी पैसे देऊ नये व त्याबाबतची तक्रार जिल्हा परिषदेच्या
व्हॉटस्अॅप क्र. 8975767749 वर नोंदवावी.
-गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कळविले आहे
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा