सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

मडाण" नदीचे पुनरूज्जीवनासाठी ना. गडकरी कडून दखल



~~ शिष्टमंडळाची ना. गडकरीशी चर्चा 
~~ परीसरातील गावकऱ्यांची मागणी 
~~ १२ गावे होवू शकतात "पाणीदार"



                      मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा पासून उगम पावणारी पिंपळखूटा येथे अडाण नदीला संगम होणारी मडाण नदी हि पुरातन नदी आहे. हि नदी उथळ झाल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे १२ गावातील अंदाजे २५ हजार नागरीक प्रभावित होतात. यामुळे मडाण नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करून पुनरूज्जीवीत करणे अत्यावश्यक झाल्याची दखल केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांनी घेतली. 
                      एकेकाळी मंगरूळपीर तालुका "पाणीदार" तालुका होता. परंतू जलस्त्रोताकडे दुर्लक्ष आणि पाणी नियोजन योग्य न झाल्याने, तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती सदासर्वकाळ निर्माण झाली आहे.अनेक गावात फेब्रुवारी महिण्यापासूनच टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागतो. तालुक्यातूनच "मडाण" ही उगम होवून तालुक्यात अडाण नदीत संगम पावते. "मडाण"च्या काठानजीक सायखेडा, निंबी, मानोली, गोलवाडी, अरक, चिंचाळा, जांब, आजगाव, हिसई, पार्डी, चांभई, पिंपळखूटा ही १२ गावे येतात. या गावातील शेकडो एकर शेतजमीन काठावर आहे. नदी गाळाने भरल्याने पावसाळ्यात शेतजमीनीतून पाणी वाहत असल्याने खरीप पिकाचे व शेतजमीनीचे प्रचंड नुकसान होते. सर्व पाणी वाहून गेल्याने रब्बी पिकासाठी नदीत पाणी नसते. तसेच विहीरी व विंधन विहीरी उन्हाळ्यात कोरड्या पडत आहे. "मडाण" खोलीकरण, रूंदीकरण व नदीत डोह निर्माण केल्यास या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. डोह निर्माण करून आवश्यकते नुसार सिमेंट नाला केल्यास २ हजार ५०० स.घ.मी. जलसाठा होवून १ हजार १०० हेक्टर शेतजमीन सिंचना खाली येवू शकते. अशा स्वरूपाची माहिती परीसरातील नागरीकांच्या शिष्टमंडळाने लिखीत स्वरूपात केंद्रीय जलसंधारण ना. नितीन गडकरी यांना नागपुर येथे दि. ५ नोव्हेंबर रोजी भेटून दिली. यावेळी गडकरी यांनी "मडाण" च्या बाबत सर्व समस्यावर शिष्टमंडळाशी चर्चा केली. कामाचे गांभीर्य ओळखून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सर्वांचे पाण्यासाठी काम करीत असल्याने कौतूक करीत, नव्याने निवडून आलेल्या सरपंचाना शुभेच्छा व मिठाई देवून अभिनंदन केले. 
                    यासाठी पुढाकार घेवून ना. गडकरीना निवेदन सादर करण्यात आले. त्यावर लक्ष्मीकांत महाकाळ, जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी, सायखेडा सरपंचा विद्या गहुले, मनिष गहुले, पं. स. सभापती निलीमा देशमुख, निंबी सरपंचा विशाखा मनवर, राजेश टोपले, मानोली सरपंचा कु. शितल लोखंडे, नारायण लोखंडे, गौतम मनवर, चंदू महाकाळ, गोलवाडी सरपंच सागर शिंदे, अशोक शिंदे, अरक सरपंचा ललिता आमटे, चिंचाळा ग्रा.प. सदस्य राजु गजभार, जांब सरपंच साहेबराव भगत, धनंजय अव्हाळे, हिसईचे किशोर जाधव, चांभई सरपंच गजानन खरबडे, पार्डी सरपंच विजय लांभाडे, पिंपळखूटा सरपंचा चंदाताई धोटे, मसोलाचे भास्कर मुळे ह्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
______________________________
लोकचळवळ निर्माण करू - महाकाळ 

सदरर्हू २५ हजार गावकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाशी ही समस्या जुळलेली आहे. त्यामुळे "मडाण"चे हे काम युध्दस्तरावर करणे आवश्यक आहे. करीता या गावाने लोकचळवळ निर्माण करू. हा प्रश्न केंद्रीय मंत्री ना.गडकरी यांनी गंभीर घेतल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. असे मत या परीसरातील नेते लक्ष्मीकांत महाकाळ  यांनी व्यक्त केले.

______________________________

"मडाण" खोऱ्याचाच जलविकास व्हावा 
                 - सचिन कुळकर्णी

"मडाण" नदीचे पुनरूज्जीवन करताना या नदीच्या खोऱ्यातील त्या गावाचा संपूर्ण विकास करून जलविकास सुध्दा व्हावा. म्हणजेच या परीसरातील सर्व तलाव, नाले,शेततलाव, वनतलाव, विहीरी सुध्दा पुनरूज्जीवीत लोकसहभागा व श्रमदानातून करता येतील. जेणेकरून या गावात आर्थिक सुबत्ता वाढेलअशी अपेक्षा जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी व्यक्त केली. 
______________________________फुलचंद भगत मो.9763007835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा