सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

नावली शाळेत शिक्षक बदली प्रकरण पेटले



नावली शाळेला शिक्षेमागील शिक्षा का



अहो शिक्षक द्या हो

चिमुकल्याचा आर्त टाहो
                            पहा व्हिडीओ 

विनोद तायडे 
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील अडीच हजार लोकवस्तीत नावली गाव... गावाकडे शासन प्रशासनाचे  पूर्णतः दुर्लक्ष...  मूलभूत सुखसुविधा पासून कोसो दूर असलेलं  गाव..शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला हे गाव... गावात  1936 साली जिल्हा परिषद शाळेची स्थापना झाली  शाळा असून  नसल्यासारखी...1 ते 8 पर्यंत वर्ग..  शिक्षणाचा सुमार दर्जा आणि शिक्षकांची अपुरी संख्या  असल्याने   पालकांनी मुलांचा प्रवेश तालुक्यातील इंग्रजी शाळेत घेतला  शैक्षणिक दृष्ट्या शिक्षा झालेलं गाव म्हणून गावाकडे  पाहिले जाऊ लागले 
2016 ला चमत्कार घडला 4 नवीन शिक्षक शाळेवर रुजू झाले शिक्षक समवयस्क आणि ध्येय वेडे असल्याने त्यांनी गावावरून शिक्षेचा कलंक पुसण्याचा चंग बांधला रात्रीचा दिवस केला ऊन पाऊस वाऱ्याची तमा न बाळगता जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष केंद्रित केले 12 ही महिने शाळा सुरू ठेवण्यात आली. कोणताही सण असो की शासकीय सुट्टी शाळेला सुट्टी माहीतच नाही .  विध्यार्थ्याना शिक्षणाची गोडी लावली  शिक्षकाची शैक्षणिक दर्जा सुधारण्याची  तळमळ पाहता  पालकांनी आपापल्या पाल्याना इंग्रजी शाळेतून काढून नावली जिल्हा परिषद शाळेत  प्रवेश घेतला .आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील विध्यार्थी विध्यार्थीनींनी सदर शाळेत प्रवेश घेतला .ओस पडलेली शाळा गजबजून गेली शाळेला प्रवेश हाऊस फुल चा बोर्ड लावण्यात आला. हाऊस फुल चा बोर्ड लागणारी नावली जिल्हा परिषद शाळा जगाच्या नकाशावर आली . शासनाने  प्रशासनाने रिक्त पदावर शिक्षकांची नियुक्ती केली नाही .कार्यरत शिक्षकाणी तन मन धनाने विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी स्वतःला झोकून दिले इतिहासात  प्रथमच नावली जिल्हा परिषद शाळेतील 6 विद्यार्थ्यांची नवोदय विध्यालयासाठी निवड झाली सर्व सुरळीत सुरु असताना शिक्षकांच्या बदल्या झाल्याची बातमी ग्रामस्थाना कळाली गाव हादरून गेले आता कुठे विध्यार्थी घडत आहेत गावात नुकतेच शैक्षणिक वारे वाहू लागले  विध्यार्थी गावाचे नाव उज्ज्वल करू लागले पालकांत बदली प्रकरणावरून शासन प्रशासना विरोधात संतापाची लाट पसरली शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली बदली रद्द करण्याचा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले मात्र शासन प्रशासन गावाला  शिक्षेमागील शिक्षा देत असल्याने जणभावनेचा उद्रेक झाला दि 6 नोव्हेंबरला अल्टीमेट 
 प्रमाने गावकरी आणि चिमुकले विध्यार्थी विद्याथीनीनी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसमोर  ठिय्या आंदोलन छेडले साहेब येतील आणि निवेदन स्वीकारतील या आशेवर तहानलेले  चिमुकले उपाशी तापाशी बसले दुपारी सी ई ओ साहेब जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींगला गेल्याचे त्यांना सांगण्यात आले आमदार अमितभाऊ  झनक यांना ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी आंदोलन स्थळी भेट दिली  सकाळ पासून सायकांळी 6 वाजेपर्यंत तहानेने आणि भुकेने व्याकुळ झालेल्या विध्यार्थ्याना भेटायला खासदार भावनाताई गवळी ,आमदार अमितभाऊ झनक आणि मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामधील मिटिंग आटोपुनच पोहचले शिक्षकांना रिलिव्ह करणार नसल्याचे आश्वासन  सी ई ओ साहेबानी दिले 

विनोद तायडे
सम्राट टाइम्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा