मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

मधुमेह दिनानिमित्त मोफत शुगर तपासणी शिबीर


सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम - जागतीक मधुमेह दिनानिमित्त आय.एम.ए. व महाराष्ट्र पॅथॉलॉजी संघटना वाशीम शाखेच्या वतीने मंगळवार, 14 नोव्हेंबर रोजी शहरात विविध ठिकाणी मोफत शुगर तपासणी शिबीर घेण्यात आले. मधुमेह दिवस हा जगभरात पॅथॉलॉजी संघटनेच्या वतीने विविध शिबीरे घेवून साजरा केला जातो. तसेच महाराष्ट्र पॅथॉलॉजी संघटनेच्या वतीने लघु चित्रपट तयार करुन प्रोजेक्टरव्दारे नागरीकांमध्ये जनजागृती केली जाते. या दिवसानिमित्त पॅथॉलॉजी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद, पाटणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, नगर परिषद, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी नागरीकांच्या शुगर तपासणी शिबीर राबवून नागरीकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नारायण डाळे, डॉ. जयश्री गुट्टे, सौ. अंजली सावळे, डॉ. किशोर लोणकर, डॉ. अश्विन मापारी यांनी अथक परिश्रम घेतले
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा