शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

स्वाभिमानीचा रास्ता रोको " डीडीआर कार्यालयात घुसू स्वाभिमानीचा इशारा" "



पवन भांदुर्गे
मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे ते अमानवाडी रस्त्यावर आज  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने  नाफेड  केंद्र  त्वरित सुरू करावे . हमीभावाने  सोयाबीनची खरेदी  करावी आदी मागण्यार्थ  जिल्हाध्यक्ष दामोदर  इंगोले  यांच्या नेतृत्वात   रस्त्या रोको करण्यात आला यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला  संपूर्ण जिल्ह्यातील गावोगावी शेतकरी संघटनेने "सोयाबीन होळी" आंदोलन छेडले आहे .

वाशिम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले पेटून उठले आहेत .शासन धोरणाविरोधात त्यांनी बिगुल फुंकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले आहे .स्वाभिमानीची आग गावोगावी धगधगत आहे .तरुण शेतकऱ्यांनी दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत  आंदोलनात उडी घेतली आहे .शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे धोरण आखले आहे .तालुक्यात नाफेड केंद्र सुरू होऊन सोयाबीनची हमी भावाने खरेदी केली जात नाही तोपर्यंत गावोगावी सोयाबीन होळी  आंदोलन तीव्र केले जाणार असल्याची माहिती  दामोदर इंगोले  यांनी यावेळी दिली. डीडीआर यांनी नाफेड केंद्र कागदावर सुरू असल्याचे सांगून अकलेचे दिवाळे काढले नाफेड केंद्र सुरू न झाल्यास स्वाभिमानी डीडीआर कार्यालयात मुक्काम ठोकण्याचा इशारा इंगोले यांनी सम्राट टाइम्सशी बोलताना दिला आहे.

पवन भांदुर्गे जऊळका

सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा