विनोद तायडे
जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षद पाटील यांच्या सामाजिक प्रेरणादायी उपक्रमाबरोबरच पोलीस महासंचालज महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सप्टेंबर अखेर पर्यंत सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करण्याचे आदेश प्रत्येक जिल्ह्यांना दिले होते त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर नागरी सुविधा केंद्र हे पोलिस अधीक्षक कार्यालय येथे सुरू करण्यात आले असून नागरिकाना या सुविधेचा लाभ कसा घ्यावा किंवा आपल्या तक्रारी ऑनलाईन प्रणाली मध्ये कशा नोंदविण्यात याव्यात या बाबतीत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आपल्या तक्रारी नोंदविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे .नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमाद्वारे जनतेला त्यांच्या तक्रारी एका क्लिकवर करता येणार असून जनतेमार्फत केलेल्या तक्रारींचे निरसन त्या त्या पोलीस ठाणे द्वारे तात्काळ करण्याचे काम पोलीस ठाणे द्वारे करण्यात येणार आहे यामध्ये नागरिकांना लॉगिन न करता हरवलेल्या व्यक्ती, फरार व्यक्ती, अनोळखी मृतदेह, अटक व्यक्तीची माहिती तसेच मागील 3 महिन्याच्या एफ आय आर प्रति उपलब्ध होणार आहेत तसेच वारंवार पोलीस ठाण्याकडे मागण्यात येणाऱ्या शस्त्र परवाना फॉर्म माहिती अधिकारी फॉर्म नाहरकत फॉर्म हे उपलब्ध होणार आहेत तसेच वेगवेगळ्या सणासाठी लागणाऱ्या परवण्या ह्या ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे त्याकरिता नागरिकांना पोलीस ठाण्यास वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत सदर कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, पोलीस उपअधीक्षक गृह किरण धात्रक उपविभागीय पोलीस अधिकारी ,वाशिम श्रीमती प्रियंका मीना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रकाश डुकरे पाटील संगनक विभाग प्रमुख पोलीस निरीक्षक ठाकरे हे उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यानी वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी सदर नागरी सुविधा केंन्द्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा