आपले धार्मीक सन, उत्सव साजरे करतांना आपल्या गावातील शांतता भंग होवु नये कोणत्याही प्रकारची त्या उत्सवाला गालबोट लागणार नाही. या गोष्टीचा विचार ठेवुन आपले उत्सव साजरे करा. असे मालेगाव येथील ठाणेदार नाईकनवरे यांनी मुंगळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शातंता समितीच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी महात्मा गांधी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष महादेव राऊत, पोलीस पाटील रमेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शातंता समितीच्या बैठकीत पुढे बोलतांना ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी सांगीतले की, कायदा हा तुम्ही तयार केला त्याचा वापर तुम्हच्यासाठी
कायम ठेवुन होणार आहे. आणी कायद्याचे पालन सुध्दा तुम्हालाच करावे लागणार आहे. आम्ही फक्त कायद्याची अंमलबंजावणी करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी कायद्याचे काटेकोर पणे पालन करावे. जेणे करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. दुर्गा विसर्जन मिरवणुकीत वाहणावर कुठल्याही प्रकारची धारधार शस्त्रे मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम लावु नये, विसर्जन मिरवणुकी दरम्यान कुठल्याही प्रकारचे असभ्य वर्तवणुक करू नये, कायद्याचे काटेकोर पणे पालन करा. या बैठीकीला मालेगाव पोलीस स्टशनचे गजानन काळे मुंगळा बिटचे जमदार संजय पिंपळकर, काॅस्टेबल समाधान मोघाड सह सर्व दुर्गा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गावातील प्रतिष्ठीत नागरीकांची उपस्थिती होती.
नंदकिशोर वनस्कर, मुंगळा
8380908011

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा