रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

अखेर गुडमॉर्निंग पथकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल


मेडशी गरोदर महिला शौच प्रकरण

सम्राट टाइम्स न्यूज

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मेडशी येथे गरोदर महिलेने गुड मॉर्निंग पथकावर विनयभंगाचा आरोप करत मालेगाव पोलीस स्टेशन तक्रार दिल्यावरून गटविकास अधिकार्यासह 4 कर्मचाऱ्यावर विनयभंगाच्या गुन्ह्यासह विविध कलमसन्वये गुहे दाखल करण्यात आले आहे 
सद्या जिल्हा हागणदरी मुक्त करण्यासाठी  वाशिम जिल्हा परिषदने कंबर कसली आहे भल्या पहाटे गुड मॉर्निग पथक लोटा बहाद्दरावर दंडात्मक कार्यवाही करत आहे मेडशी येथे 5 ऑक्टोबर ला सकाली 5 वाजता गुड मॉर्निंग पथकाने गरोदर महिलेवर कार्यवाही केली महिलेने मालेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली की ती आणि  तिची बहीण मेडशी ते चोंडी रस्त्यावर फिरायला गेले असताना गुड मॉर्निंग  पथकाची गाडी अचानक आली गटविकास अधिकार्यासह कर्मचाऱ्यानी हात धरून विनयभंग केला महिलेच्या तक्रारीवरून मालेगाव स्टेशन ला गटविकास अधिकार्यासह 4 कर्मचार्यावर विविध कलमन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गुड मॉर्निंग  पथकावर गुन्हे दाखल होण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे  पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा