गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

वाशिम जिल्ह्यातील दानशुर कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना कर्जमुक्तीकरीता मदत



सम्राट टाइम्स न्यूज

 वाशिम जिल्हृयातील प्रभाकर लहाने (यंत्रचालक) 33 के.व्ही. उपकेंद्र मसलापेन उपविभाग-रिसोड  यांनी शासनाने जाहिर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना-2017 योजनेकरीता  शेतकऱ्यांना मदत म्हणून त्यांच्या दिवाळी निमित्त मिळणाऱ्या वेतनातून रुपये 8963/- (अक्षरी रुपये आठ हजार नऊशे त्रेसष्ठ फक्त)  मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याकरीता जिल्हाधिकारी वाशिम व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वाशिम यांचेकडे रुपये 8963/- चा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. या मदती करीता त्यांना या कार्यालयाकडून प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वाशिम यांनी कळविले आहे.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा