दि.5 ऑक्टोबर
प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन रिसोड
श्री.शिवाजी परिवारातील मोप येथील स्व.विठोबा सहादु पांडे यांचे दि.०४/१०/२०१७ रोज बुधवार ला सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान वृध्दापकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्युसमयी त्याचे वय ८५ वर्षे होते.दि.०५/१०/२०१७ रोज गुरुवारी अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला.अत्यंत मनमिळावू स्वभावाचे कर्तव्यदक्ष स्व विठोबा सहादु पांडे यांची १९६३मध्ये श्री शिवाजी विद्यालत व कनिष्ठ महाविद्यालय मोप येथे नायक या पदावर नियुक्ति करण्यात आली होती.तर शेवट पर्यंत त्यांनी एकाच शाळेत सेवा दिली. १९९३ मध्ये सेविनिवृत्त झाले.शिवाजी परिवारातील सदस्य स्व. विठोबा सहादु पांडे यांना श्री.शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे सहसचिव मा.श्री दादासाहेब लाहोरे यांनी शिवाजी परिवाराच्या वतीने श्रध्दांजली अर्पण केली. तर श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोप च्या वतीने प्राचार्य डि.एन.अघडते सर,प्रा.अ.मो.सोनुने सर यांनी श्रध्दांजली अर्पण केली.तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थ्यींनी यांनी सामुहिक श्रध्दांजली अर्पण केली.
महेंद्रकुमार महाजन रिसोड
9960292121
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा