गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

शोध मनातील कृष्णाचा” नाटिका आकर्षण…



(प्रतिनिधी- माहुर):- माहुर येथिल श्री रेणुकागडावर कोजागिरी पौर्णिमा निमित्त संगित महफिल रंगणार आहे. पुसद येथिल कोरटकर बंधु सह पंचक्रोशीतील अनेक कलावंत आपली संगित सेवा माता चरणी देणार असुन औरंगाबाद येथिल “शोध मनातील कृष्णाचा” हि नाटिका मुख्य  आकर्षण असणार आहे. भाविकांनी संगित महफिल सह दर्शनाचा लाभ घ्यावा असे अहवान विश्वस्त समिती ने केले आहे.

माहुर गडावरील रेणुका माता मंदीर पुढिल मंडपात प्रती वर्षा प्रमाने यंदा हि कोजागिरी पौर्णिमा   साजरी केली जाणार आहे. रेणुकादेवीचे भक्त तथा संगित प्रेमी प्रदिप कोरटकर, संजय कोरटकर, सारंग कोरटकर हे पुसद येथिल कलावंत व इतर पंचक्रोशीतील कलाकार उपस्थीती लावणार आहे. औरंगाबाद येथिल गिरधर पांडे लिखीत, स्नेहा भाले, संध्या शेंडे यांची संकल्पना व वैजयंती जोशी यांनी संगीत बद्ध केलेले “शोध मनातील कृष्णाचा” नाटिका सादर करण्यात येणार आहे. या संगित महफिलीचा व प्रसाद व दर्शनाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, भवानीदास भोपी, विनायक फांदाडे, श्रीपाद भोपी, आशिष जोशी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा