मंगरुळपीर-: येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाटिकेत स्थानिक मान्यवरांच्या वतिने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सौरव सपकाळ मित्र मंडळातर्फे मिठाईचे पाकिटे वाटप करण्यात आले.
देशातील दलीत पिडीत शोषीत समाजाच्या ऊत्थानासाठी विजयादशमीच्या दिवशी देशाचे संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायासह नागपुर येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. या दिवसाला ६१ वर्षे पुर्ण झाली. त्यानिमीत्त देशभर धर्मांतरीत लाखो बौद्ध अनुयायानी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. यानिमीत्त राहुलदेव मनवर, इंगोले, इंजिनिअर प्रविण इंगळे, सौरभ सपकाळ, दिनेश सरदार, संदिप इंगळे, राजेश अंबोरे, मेजर इंगोले, गुड्डु पडघाण, मिलिंद भगत, बजरंग इंगोले, गोपाल खाडे, राजेश सरदार, सुशांत भगत, राहुल राऊत, अनिल भगत, मिलिंद भगत यांचेसह असंख्य समाजबांधवांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी यावेळी सौरव सपकाळ मित्र मंडळातर्फे येथे येणार्या-जाणार्या नागरीकांना मिठाईच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले..............,
फुलचंद भगत,मंगरुळपीर
जि.वाशिम मो.9763007835

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा