रविवार, १० सप्टेंबर, २०१७

मेडशी ग्रामपंचायत पडद्या मागील षडयंत्र


जिल्हा परिषद सदस्याची कुरघोडी


विनोद तायडे 
घाणीत होत असलेली अन्न विक्री
वाशीम - मेडशी ग्राम पंचायत मालेगाव तालुक्यातील मोठी समजली जाणारी ग्राम पंचायत आहे . सद्यःस्थितीला ग्रामपंचायत चा रिमोट कंट्रोल हरविल्याने कारभार अनियंत्रित झाला आहे. गावात नाल्या, रस्ते  पाणी,विद्युत पथदिवे, शिक्षण, आरोग्य घरकुल, शौचालय,  आठवडी बाजार मूलभूत सुखसुविधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे  . जिल्ह्याचे
ग्रामपंचायत समोर साचलेले पाणी.
 मिनिमंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतला कित्येक वर्षासपासून नामफलक नाही  लोखंडी गेट  ची मोडतोड झाली आहे .कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत चे शौचालय बंद अवस्थेत असल्याने गाव हागणदरी मुक्ती चा संदेश तरी  कसा देणार ? हा एक प्रश्न आहे . ग्रामपंचायत प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगल्या गेली आहेत .ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राज्य मंत्री बाबासाहेब सरनाईक यांच्या हस्ते 1973 मध्ये झाले. ग्रामपंचायत भवनांची दुरवस्था झाली आहे ग्रामपंचायतच्या दुरुस्तीच्या नावाखाली   कित्येक वेळा बिले काढण्यात आले मात्र तो निधी कोणाच्या घशात गेला हा संशोधनाचा विषय  आहे  2015 मध्येही ग्रामपंचायत दुरुस्ती आणि शौचालय दुरुस्तीच्या नावाखाली अनेक नियमबाह्य कामे करण्यात आली .मीडियाने हा प्रकार उघड केल्याने ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले .राजकीय नेते मात्र नामानिराळे राहले बळी गेला तो ग्रामविकास अधिकाऱ्याचा ! मध्यंतरी काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या सत्तेत राहण्यासाठी किंगमेकर लाच  आव्हान देण्यात आले काही सदस्यनी बंड पुकारले वेगळी चूल मांडली आणि चूल पेटलीही. राजकीय नाट्यमय घडामोडी च्या पडद्या मागील सुत्रधार एक जिल्हा परिषद सदस्य असल्याचे वेगळी सांगण्याची गरज नाही . जिल्हा परिषद सदस्यांचा  हेतू साध्य झाल्याने  त्याला मेडशी गावात  विकासकामे टाकणे शक्य झाले अन्यथा त्याला मेडशी गावात 5 वर्षही कामे टाकणे शक्य झाले नसते. जिल्हा परिषद सदस्याला विकास कामावर कमिशसनपोटी करोडो रुपयांचा फायदा झाला  . जिल्हा परिषद सदस्य मेडशीच्या राजकीय सारिपाटावरील वझीर ठरला नको असलेले ठराव पारीत झाले  त्याने चक्क  गावातील नेतृत्वालाच आव्हान दिले . त्याने काही लाचार मानसिकतेच्या लोकांना हाताशी धरून स्वताची पाठ स्वताच थोपटून घेतली एकंदरीत नाट्यमय राजकीय घडामोडीत गाव नेत्याला शह बसला सद्यःस्थितीला सदस्यांची चूल पेटविणारा  रिमोट कंट्रोल हरविल्याने  ग्रामपंचायतचा कारभार अनियंत्रित झाला आहे . संपूर्ण गाव समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. नाली साफसफाई , आठवडी बाजार लिलावात  मोठया प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्याने गटविकास अधिकाऱ्याकडे करुनही चौकशी अहवाल गुलदस्यांत आहे .पाणी कुठे मुरले  हेच समजायला मार्ग नाही . जिल्हा परिषद सदस्यांने ग्रामपंचायत प्रशासनाला  हाताशी धरून  अनेक बोगस कामे केलीत. लाखो रुपये बिल काढल्याची तक्रार  माजी उपसरपंच मोहन राठोड यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली कार्यवाहि मात्र शून्य आहे . राज्यातील  सत्ताधारी  पक्षाच्या एका  जिल्हा परिषद सदस्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर करत नित्कृस्ट दर्जाच्या बांधकामाचे बिले काढली असल्याची चर्चा आहे . 10 ते 20 टक्के कमिशन पोटी  एका जिल्हा परिषद सदस्यांने मेडशी सर्कल मध्ये विकास कामाचा सपाटा  लावला. कॉलेटी कंट्रोल विभागाने कामाची तपासणी केल्यास  अनेक बोगस कामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे  मिनिमंत्रालयातील शिलेदाराची पंजे गैरव्यवहाराने बरबटली आहेत एकेकाळी दिल्ली दरबारी वजन ठेवून असणाऱ्या पुढाऱ्याचे वजन हलके झाल्याने   पुढारी अज्ञानावात गेले की काय अशी शंका निर्माण झाली आहे कमिशानखोर वृत्ती वाढीस लागली आहे .दोन वर्षापूर्वी १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेली नियमबाह्य कामाने ग्रामविकास अधिकाऱ्याचा बळी घेतला . तेव्हापासून गावाला ग्रहण लागले गावाचा विकास ठप्प झाला कर्तव्यदक्ष ग्रामसेवकावर येथे हल्ला झाल्याच्या बर्याच घटना घडल्या . कित्येक वर्षे कोणताही अधिकारी येथे येण्यास तयार नव्हता. मीडियाने ग्रामविकास अधिकारी नियुक्तीचा प्रश्न लावून धरल्याने सीईओ यांनी वृत्ताची दखल घेत  ग्रामविकास अधिकाऱ्या ची नियुक्ती केली मात्र नियुक्ती आदेश देऊनही  ग्रामविकास अधिकारी रुजू झालेच नाही .अखेर भारिप बहुजन महासंघाने ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याने या ठिकाणी ग्रामविकास अधिकारयाची नियुक्ती करण्यात आली.  कमिशन पोटी आठवडी बाजाराची दुरवस्था झाली आहे व्यापाऱ्याना बसण्यासाठी ओटे नाहीत ,पुलाची दुरवस्था झाली आहे.12 गावातील  बाजरहाटासाठी येणाऱ्या जनतेसाठी कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही मग वर्षोनूवर्ष बाजार लिलावातून  येणारे लाखो  रुपये जातात तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे
यावर्षी बाजार लिलाव 1 लाख 93 हजार 500 रुपयात करण्यात आला त्यापैशातून आठवडी बाजारात सुख सुविधा पुरविणे गरजेचे असताना तो पैसा कोणाच्या घशात घातला याचा उलगडा होणे महत्वचे आहे. व्यापाऱ्याना बसण्यास कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही ओट्याची दुरवस्था झाली आहे .सांडपाणी बाजारात सोडले जात असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य  पसरले  आहे. गावकऱ्याना बाजार करताना कसरत करावी लागत आहे. आठवडी बाजाराचा पूल जमीनदोस्त झाला असल्याने नाल्याचे पाणी साचून डबके तयार झाले आहे .डबक्यालगत मिठाईचे दुकाने  लावले जात असल्याने जनतेचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मेडशी गावाचा वाली कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा