गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

स्वच्छता हीच सेवा अभियानातुन शहरी व ग्रामिण भागात जनजागृती

स्वच्छता हीच सेवा अभियानातुन शहरी व ग्रामिण भागात जनजागृती



पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जिल्ह्यात शुभारंभ

विनोद तायडे

वाशिम
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता
मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य
संस्थांमध्ये दिनांक 15 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच
सेवा हे विशेष जन जागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा
जिल्हास्तरीय शुभारंभ दि 15 सप्टेबर रोेजी मानोरा तालुक्यातील विठोली या
गावात ना. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी खा. भावना गवळी, जि. प. अध्यक्ष हर्षदा दिलीपराव देशमुख,
उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, जि. प. चे
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह सर्व सभापतींची उपस्थिती
राहणार आहे.
हे अभियान शहरी व ग्रामिण भागात राबविण्यात येणार आहे. याबाबत
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील
यांनी याबाबत सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार व विभाग प्रमुख यांची एक
बौठक घेऊन याबाबत सविस्तर सुचना दिल्या. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी
कार्यालय, जिल्हा परिषद, तालुका स्तरीय वर्ग-1 ते वर्ग 3 दर्जाचे
अधिकारी- कर्मचारी यांना जिल्ह्यातील एकेक गाव दत्तक देण्यात येणार आहे.
सदर गावात स्वच्छता मिशन राबविण्यासाठी पुढाकार व समन्वय ठेवण्याची
जबाबदारी या दत्तक अधिकारी- कर्मचारी यांची राहणार आहे. याबाबत
जिल्हाधिकार द्विवेदी यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आले आहेत.
या अभियानादरम्यान प्रत्येक गावात स्वच्छता दिंडीचे आयोजन करणे, शौचालय
निर्मिती करिता शोषखड्याचे ले-आऊट देणे व प्रत्यक्ष कामांना सुरुवात करणे
आणि यासाठी दत्तक अधिकारी- कर्मचारी यांच्यासह गावातील अन्य कर्मचारी,
ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, आशा- अंगणवाडी सेविका, ग्रा. प. कर्मचारी,
जलसुरक्षक आदिंनी गृहभेटी देऊन शौचालय बांधकामांना प्रोत्साहन देण्याचे
अपेक्षित आहे. त्याच बरोबर शाळा- अंगणवाडी मध्ये स्वच्छ शाळा दिवस पाळणे
व प्रभात फेरीचे आयोजन करुन स्वच्छतेचा संदेश देण्याचे  आणि प्राथमिक
आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र याठीकाणी स्वच्छता मोहिम राबविण्याच्याही
सुचना आहेत. या अभियाना दरम्यान शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस
डेपो ई. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत संबंधित
गटविकास अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. विविध पध्दतीने
जनजागृती उपक्रम राबवुन जिल्हा स्वच्छ बनविण्यासाठी सर्वांनी योगदान
देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश पाटील आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले आहे

विनोद  तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा