महेंद्र महाजन जैन
....रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील प्रियदर्शिनी कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिन कार्यक्रम संपन्न झाला .महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .यावेळी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य बी .पी .इंगळे यांची उपस्थिती होती ..यावेळी प्रा .वसंतराव देशमुख ,प्रा .मिलिंद इंगळे ,प्रा .संतोषराव देशमुख ,प्रा .सौ .संगीता रेखे ,प्रा .प्रमोद हुंबाड ,प्रा .संजय पांढरे ,प्रा .पंडितराव देशमुख यांची उपस्थिती होती .मान्यवरमंडळीचे प्राचार्य बी पी इंगळे यांनी स्वागत करून नविन पायंडा निर्माण केला .प्राचार्य इंगळे हे हिंदी विषयाचे अध्यापक असल्यामुळे आणि त्यांचा हिंदी विषयाचा गाढ़ा अभ्यास असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषा राष्ट्रभाषा का असावी आणि हिंदी भाषेला ज्या कवी व साहित्यिकानी समृद्ध केले त्यामध्ये कवी कालीदास ,तुळशीदास ,हरिवंशराय ,कवी कबीर याची माहिती दिली आणि दोहे गायन केले आणि हिंदी भाषेतून मार्गदर्शन केले .संचालन प्रा .संजय भालेराव यांनी हिंदी भाषेतुन करून श्रोत्यांची मने जिंकली .आभार प्रा .अशोक गंगावने यांनी व्यक्त केले .यावेळी शिक्षक ,विद्यार्थी व कर्मचारी यांची उपस्थिती मोठया संख्येने होती .
महेन्द्र महाजन जैन
9960292121 रिसोड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा