शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

म.रा.मराठी पत्रकार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी निलेश सोमाणी

म.रा.मराठी पत्रकार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी  निलेश सोमाणी


विनोद तायडे वाशिम

वाशीम सामाजिक कार्यकर्ते तथा  युवा पत्रकार निलेश सोमाणी यांची महाराष्ट्र  राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्यावतीने राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे , प्रदेश उपाध्यक्ष कुंदनदादा  जाधव व विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात अमरावती विभागीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.

 सोमाणी हे गत विस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांना पत्रकार क्षेत्रात प्रतिष्ठेचा  नागपूर येथील मा.बा.गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा पत्रकारिता पुरस्कार , शासनाचा  महात्मा गांधी तंटामुक्ती पत्रकारिता पुरस्कार व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सामाजिक कार्याकरिता विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.  यापूर्वी  त्यांची महाराष्ट्र  राज्य मराठी पत्रकार संघाच्या वाशीम ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती. त्यांची कार्याची दखल देत त्यांना विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून वाशीम, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्हयात पत्रकार संघाचे संघटन वाढवून लवकरच पाचही जिल्हयात जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती निलेश सोमाणी यांनी दिली.सोमाणी यांच्या निवडीबद्‌दल त्यांचे विविध संघटना, पत्रकार, राजकिय पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. ग्रामीण भाग धनज बु. येथून सोमाणी यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला होता.  आज दै. मातृभूमिचे वाशीम आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी लोकसत्ता, लोकमत, दैशोन्नती, हा  माझा देश , भास्कर आदि वृत्तपत्रात वेगवेगळया पदावर कार्य केलेले आहे.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा