गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

भुलोडा येथे जुनी इमारत ठरत आहे धोकादायक


विनोद नंदागवळी
ग्राम भुलोडा येथे जुन्या शाळेची इमारत अतिशय मोठ्या प्रमाणात निकृष्ट झालेली आहे. त्या इमारतीमध्ये जनावरे बसतात कधी मुले खेळतात. त्यामुळे त्या इमारतीकडे पाहिल्यास ती कधी  पडणार याची काही हमी नाही. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. हि इमारत जर पडली तर जीवित हानी होण्याचा धोका आहे. ही इमारत शासकीय असल्या कारणाने ती पडण्यास सरकारी मंजुरी हवी असते. पण ती मिळत नसल्यामुळे हि इमारत धोकादायक ठरली आहे. गावातील नागरिकांचे असे मत आहे कि, गावपातळीवर ठराव घेऊन ती इमारत पाडून टाकावी पण तसे करता येत नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागत आहे. कारण शासकीय नियमानुसार इमारत १०० वर्षे पूर्ण न झाल्यामुळे ती पाडता येत नाही. ह्या इमारतींमुळे जर कोणाच्या जीवाला काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात उभा आहे. शासनाने ह्या गोष्टीची दखल घेऊन गावकर्यांना व ग्रामपंचायतला हि इमारत पाडण्याचे आदेश द्यावे हि गावकर्यांची मागणी आहे.
 विनोद नंदागवळी मो.
 ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा