विनोद तायडे वाशिम
जिल्ह्यात २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. ७ ऑक्टोंबर २०१७ रोजी मतदान होणार आहेत. याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार दि. १ सप्टेंबर २०१७ पासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दि. ७ ऑक्टोंबर रोजी मतदान व दि. ९ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने दि. १० ऑक्टोंबर २०१७ पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, सोमवारी शासकीय सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी आयोजित केला जातो. ऑक्टोंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी, दि. २ ऑक्टोंबर २०१७ रोजी महात्मा गांधी जयंतीची शासकीय सुट्टी आहे. तसेच पुढील कामकाजाचा दिवस मंगळवार दि. ३ ऑक्टोंबर २०१७ रोजी जिल्ह्यात लागू असणाऱ्या आदर्श आचारसंहितेमुळे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
विनोद तायडे वाशिम
8888277765
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा