मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

कारंजा तालुक्यात एकाच शौचालयाचे दोन लाभार्थी

कारंजा तालुक्यात एकाच शौचालयाचे दोन  लाभार्थी

विनोद नंदागवळी
        कारंजा तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय  बांधकाम चालु असुन त्यामध्ये  अनुदान घेण्यासाठी  चक्क एकच शौचालय दोन लाभार्थाचे नावे बांधकाम दाखवुन दोन शौचालयाचे अनुदान घेवुन शासनाची दिशा भुल केल्याचे निदर्शनात आले आहे .त्यामुळे स्वच्छता अभियानाला खिळ बसत असल्याचे दिसुन येत आहे. शौचालय फक्त कागदावरच दाखवुन हागणदरी मुक्त गांव दाखवण्यासाठीच ही सर्व ऊठाठेव चालु आहे का???  की आर्थिक हित संबंधासाठी असे अनेक प्रश्न उपस्थीत होत आहे त्यामुळे शौचालय बांधकाम करून त्याच्या खरोखरच लाभार्थी उपयोग करतो का?  हे पाहणे  आवश्यक आहे. नाहीतर स्वच्छ भारत मिशन ही संकल्पणा पुर्ण होईल की नाही याची शाश्वती राहणार नाही.

विनोद नंदागवळी
९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा