1 ते 4 ऑक्टोंबर पर्यत शहरात श्री हनुमान रामकथा
ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिर जिर्णोध्दार : बाहेती परिवाराचे आयोजन
वाशीम : स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहूरवेस येथील ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिराचे जिर्णोध्दार व पुन:स्थापना निमीत्त बाहेती परिवाराच्या वतीने श्री श्री रविशंकर यांची कृपापात्र शिष्या देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून 1 ते 4 ऑक्टोंबर पर्यंत वर्तमान जीवनावर आधारित श्री हनुमान रामकथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी रविवार 1 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत स्थानिक श्री मध्यमेश्वर मंदिरापासून हनुमान मंदिरापर्यंत 108 कलशधारी महिलांची भव्य कलशयात्रा निघणार आहे. यामध्ये महिलांनी लाल किंवा केशरी साडी व पुरूषांनी पांढरा पायजमा, कुर्ता हे वस्त्र परिधान करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच 1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7 ते 9.30 पर्यंत श्री हनुमान रामकथेमध्ये श्री रामचरित्र मानस पात्र परिचय, सोमवार 2 ऑक्टोंबर रोजी श्रीराम व श्री हनुमान जन्म, मंगळवारी 3 ऑक्टोंबर रोजी केवट, शबरी व श्री हनुमान भेट, बुधवार 4 ऑक्टोंबर रोजी श्रीराम राज्यभिषेक याप्रसंगाचे गुणगाण व कथा होणार आहे. मंगळवार 3 ऑक्टोंबरला दुपारी 12 ते सायंकाळी 7 पर्यंत रोकडीया हनुमान प्रभातफेरी मंडळ शेलू यांच्या सानिध्यात संगीतमय 108 श्रीहनुमान चालिसापाठचे आयोजन करण्यात आलेले आहे. गुरूवार 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत जिर्णोध्दार व पुन:स्थापना, दुपारी 1 ते 4 महाप्रसाद व सायंकाळी 7 वाजेपासून महारास सत्संग, ध्यानज्ञानचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा व कलशयात्रेत महिलांनी कलश घेवून मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक बाहेती परिवाराने केले आहे.
महादेव हरणे
9922224889

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा