जागतिकीकरण आणि भारत पुस्तकाचे प्रकाशन
सोनपेठ : येथिल कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संतोष रणखांब व प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे, प्रा. डॉ. कल्याण गडकर राजक्रांती वलसे संपादित जागतिकीकरण आणि भारत या पुस्तकाचे जालना येथे संपन्न झालेल्या पहिल्या श्रमिक साहित्य संम्मेलनाच्या समारोप सत्रात डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, डॉ. डी.एल कराड, कॉ. कुमार शिराळकर, अण्णा सांवत यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
जागतिकीकरण आणि भारत या ग्रंथात एकुण बाविस लेख असून राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय, ग्रामिण राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, संस्कृती, भाषा, विविध कष्टकरी चळवळी, समग्र भारतीय समाज घटकांवरील जागतिकीकरणाचा झालेला परिणाम व होणारा परिणाम या विषयावर लेख आहेत. आजच्या परिस्थितीत अशा विषयाचे पुस्तक हे अनेक विचारांना चालना देणारे आहे, असे मत श्रमिक साहित्य संम्मेलनातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
या पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्राचार्य वंदना तिडके व प्रा. डॉ. यशवंत सोनूने यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी अनेक साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते.
या बद्दल प्रा. डॉ. रणखांब यांचे हशिप्रचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा