शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

औरंगाबादमध्ये बॅंक अधिकाऱ्याचा खून

सम्राटटाइम्स.ब्लाॅगपोस्ट.इन
जितेंद्र होळकर मुलासह
औरंगाबाद -   जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेकटा शाखेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले जितेंद्र नारायण होळकर (वय ४७) यांचा राहत्या घरात गळा चिरुन खून झाल्याचा प्रकार शहरातील छत्रपती नगरमध्ये ९ सप्टेंबरच्या पहाटे उघडकीस आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळकर हे आपला 15 वर्षीय मुलगा आणि पत्नीसह राहत होते. हत्या झाली तेव्हा त्यावेळी होळकर हे घरातील एका खोलीत तर पत्नी व मुलगा दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. होळकर यांच्या खोलीतून आवाज आल्यानंतर त्यांच्या पत्नीला हत्या झाल्याचे समजले. ही बाब त्यांनी फोन करुन शेजाऱ्याना सांगितली. शेजा-यांनी तातडीनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोचले असता त्यांना होळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. मारेकऱ्यांनी होळकर यांचा आधी दोरीने गळा आवळून नंतर गळा चिरला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा