विभागीय तलवारबाजी स्पर्धेेत अनुज ढवळे व्दितीय
राज्यस्तरावर निवड
विनोद तायडे वाशीम
क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे व विभागीय क्रिडा कार्यालयाच्या वतीने अमरावती येथील क्रिडा संकुलात 20 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या 17 वर्षे वयोगटामधील शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेत वाशीमच्या अनुज उमेश ढवळे या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करुन विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला.
अनुजने या खेळात चमकदार कामगिरी करुन विरोधी खेळाडूंना नमवत व्दितीय क्रमांक प्राप्त केल्यामुळे त्याची पुढे होणार्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेकरीता अमरावती संघामध्ये प्रवेश मिळविला. अनुजने आपल्या या यशाचे श्रेय वाशीम जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे जिल्हा सचिव संदेश पवार, निन्जा फेन्सिंग क्लबचे प्रशिक्षक यशवंत महाजन, विजय धोंगडे, दिपक महाजन, अक्षय गोरे, अशांत कोकाटे, पंकज जंगले, अभिषेक ढगे, साहेब तोटावार यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले आहे. अनुजच्या या यशामुळे जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा