सोमवार, २२ जानेवारी, २०१८

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर इसमाचा मृतदेह आढळला


  👉 एकच खळबळ

👉 घातपाताची शक्यता 

सम्राट टाइम्स मीडिया

नागपूर -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर  खिर्डा नजीक रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपामध्ये आज दुपारी  अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत
खिर्डा गावानजीक महामार्गाच्या   कडेला मृतदेह असल्याची माहिती जउळका पोलिसांना मिळताच पोलीस ताफा घटना स्थळी पोहचला पोलिसांनी पंचनामा केला अनोळखी इसमाचे अंदाजे वय 35-40 असुन इसमाच्या उजव्या हातावर एस बी चव्हाण इंग्रजीमध्ये  व सतीष मराठी मध्ये गोंदलेले व छातीवर मर्द असे गोंदलेले आढळुन आले आहे अंगामध्ये पांढरा चौकड्या शर्ट विटकरी रंगाची बनियान व जिन्स फीकट निळा पँन्ट परीधान केलेला असुन सदर इसमाजवळ कोणतेही आेळखीचे कागद पत्रे सापडले नाही.

उपस्थीतामध्ये सदर इसमाची घातपात झाला असल्याची  चर्चा चालु होती तरी सदर  इसमाची ओळख पटविण्याचे अव्हान जउळका पोलीसांन समोर ठाकलेले आहे तरी वरील इसमाची ओळख किंवा काही माहीती असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा असे आव्हान जऊळका पोलीसांनी केले आहे.
व्ही एस आरसेवार साहेब  9766633143

ताजने मेजर
9049066253
पोलीस स्टेशन जऊळका (रेल्वे)
07254272016

महादेव हरणे 
सम्राट टाईम्स 
कार्यकारी संपादक 
9922224889

रविवार, २१ जानेवारी, २०१८

केकतउमरा येथील रखडलेले विविध कामांचे पिआरसी अध्यक्ष पारवे यांना निवेदन


* 14 वित्त आयोगाचा निधी खर्च करावा 

* दलित वस्तीचा निधी खर्च करावा 

वाशिम -- येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील विविध विकास कामे रखडलेले आहेत त्यामुळे हे कामे त्वरित सुरु करून गावाच्या विकासासाठी आलेला निधी हा खर्च करावा. अश्या विविध आशयाचे निवेदन पंचायत राज समितीचे अध्यक्ष मा.आमदार सुधीर पारवे यांना दिनांक 18 रोजी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेतृत्व प्रविण पट्टेबहादुर यांनी दिले आहे. 
         निवेदनात पुढे म्हटले की, 14 व्या वित्त आयोगाच्या निधिचा अजूनही वापर झाला नाही त्याची अमलबजावणी झाली नाही ,त्याचबरोबर दलित वस्तीचा असणारा स्वतंत्र निधी देखील खर्च झालेला नाही. त्यामुळे या सर्व बाबीचा विचार करून  आपण संबधीत विभागाला तश्या सुचना द्याव्या अशी मागणी देखील दिलेल्या निवेदनातुन प्रविण पट्टेबहादुर यांनी केली आहे.

सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

भारिप बहुजन महासंघाच्या वाशिम शहराध्यक्षपदी रवी पट्टेबहादुर यांची निवड.


वाशिम - दिनांक 20 रोजी वाशिम शहरातील सामाजिक कार्यकर्ते रवी पट्टेबहादुर यांची भारिप बहुजन महासंघाच्या वाशिम शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांची ही निवड श्रधेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरुन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष युसूफसेठ पुंजानी यांनी त्यांना नियुक्ती पत्र देवूंन केली आहे.त्यांना या  पत्रात असे सुचविले की,आपण गोरगरीब सर्वसामान्य जनतेची कामे करुण त्यांना न्याय द्यावा व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपण तत्पर राहावे असे सुचविले आहे.यावेळी बोलतांना रवी पट्टेबहादुर म्हणाले की,माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी नक्कीच गोरगरीब जनतेच्या कामासाठी व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असा विश्वास त्यांनी यावेळी दाखविला.यावेळी भारिप बहुजन महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

पिंप्री सरहद्द येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न.*



पिंप्री सरहद्द
मौजे पिंप्री सरहद्द येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष प्रवेश व कलावंताचा मेळावा संपन्न झाला. रामचंद्र हजारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्या अगोदर शाखाचे उदघाटन झाले शाखा अध्यक्ष म्हणुन अनंतराव देशमुख याची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रा.कॉ.चे प्रदेश सरचिटणीस बाबाराव खडसे पाटील हे होते. तर उदघाटक म्हणुन रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष तेजराव पाटील हे होते.मार्गदर्शक म्हणून लोकसेवा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष शाहीर रतन हाडे हे होते. प्रमुख उपस्थितीत रा. कॉ. चे उपाध्यक्ष नंदू पाटील काठोळे व युवकाचे तालुकाध्यक्ष रवी नरवाडे, गजानन सरनाईक, नितीन सरकटे,मुरलीधर जुनघरे, राजु शेवाळे, सुभाष हाडे,भास्कर हाडे,फकिरा हाडे, गजानन बाजड, दत्तराव बाजड, भगवान जाधव सेवा सोसायटी अध्यक्ष गजानन वानखेडे, ज्ञानेश्वर भोसले,नामदेव बोडखे,संभाजी नेहुल, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शेकडों कलावंत व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला बाबाराव खडसे व तेजराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील कठोळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनंत देशमुख, संदीप हजारे,खालीक भाई, मधुकर हजारे,कृष्णा पाटील, राहुल पाटील गवळी,अमोल ठोकरे हे होते.

सम्राट टाईम्स, प्रतिनिधी
पिंप्री सरहद्द

शनिवार, २० जानेवारी, २०१८

श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचे तालुकास्तरीय स्वछतामित्र करंडक वक्तृत्व स्पर्धेत यश


पंचायत समिती मंगरुळपीर द्वारा  तालुकास्तरीय स्वछतामित्र करंडक वक्तृत्व स्पर्धा  15 जानेवारी 2018 रोजी आयोजीत केली होती. सदर स्पर्धेत महाविद्यालयाचे शीतल खडसे,निकिता इंगळे,शुभांगी ठाकरे,रुपाली बाईस्कर सहभागी झाल्या .
कु शुभांगी ठाकरे बी ए भाग 1 ची विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला व जिल्हास्तरावर सहभागी होण्यासाठी पात्र ठरली. वूमन सेल च्या समन्वयक डॉ. ममता पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे,सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले 
आणि  पुढील स्पर्धेसाठी सुयश चिंतीले.

सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी भिडे -एकबोटे याच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे धरणे आंदोलन





वाशिम 


1 जानेवारी शौर्यदिनी भीमा कोरेगावात दंगल घडविणाऱ्या संभाजी भिडेसह मिलिंद एकबोटे ला अटक करा आणि बहुजन समाजातील निरपराध तरुणावरील 395 प्रमाणे नोंदविलेले गुन्हे त्वरित मागे घ्या आदि मागण्यार्थ भारिप बहुजन महासंघाने आज सकाळी 11 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन छेडले . धरणे आंदोलनाचे नेतृत्व भारिप  बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष युसुपभाई पुंजानी यांनी केले 

या वेळी कारंजा नगर परिषद अध्यक्ष शेषराव ढोके,डॉ.नरेश इंगळे,विजय मनवर,अड पि पि अंभोरे,मधुकरराव जुमडे जिल्हा नेते,सुभाष बोरकर,माणिकराव सोनोने,गजानन भोयर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष,संजय वैरागडे,अध्यक्ष मातंग समाज संघ,अड.सचिन पटेबहादूर,अध्यक्ष भीम आर्मी संघटना यांच्या सह सर्व सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाला मराठा समाज,डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल ऍक्टिवा फोरम,तेली समाज,आदीवाशी समाज, भीम आर्मी संघटना,मुस्लिम समाजासह सर्व पुरोगामी  संघटनांनी पाठिंबा दिला .

सम्राट टाइम्स मीडिया

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

तालुका स्तरीय स्पर्धेचे आयोजन



राजस्थान आर्य कॉलेजचे क्रिडागण वाशीम येथे युवा केंद्र  अंतर्गत तालुका स्तरीय कबड्डी,हॉलीबॉल,100 मिटर रनिंग,या या व्यतीरिक्त अनेक स्पर्धा यांचे आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटण राष्ट्रिय सेवा योजना समन्वयक प्रा.शुभांगी दामले यांनी केले .तर प्रमुख अतिथी म्हणून राजस्थान कॉलेज चे प्राचार्य भगत सर व यावेळी अनेक जन उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक देवानंद इंगोले,राजेन्द्र गायकवाड,प्रविण पट्टेबहादुर ,आकाश काकडे,संदीप राऊत,नीलेश अंभोरे,एकनाथ राठोड यांनी केले होते.                               
रंजित वानखेडे वाशिम प्रतिनिधी  8007447638

सुशील भगत यांची बहुजन पत्रकार संघटना मानोरा तालुका अध्यक्ष पदी निवड


मानोरा प्रतिनिधी:बहुजन पत्रकार संघटनेचे संस्थापक पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्या नेतृत्वात आणि वाशिम जिला अध्यक्ष विनोदभाऊ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा तालुका अध्यक्ष पदी साखरडोह येथील पत्रकार तथ साप्ताहिक सम्राट चे मानोरा तालुका प्रतिनिधी सुशील बलवंत भगत यांची वाशिम येथील हॉटेल व्यंकटेश मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते मानोरा तालुका बहुजन पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,या बैठकीला जिला अध्यक्ष विनोदभाऊ तायडे,फुलचंदभाऊ भगत ,महादेवभाऊ हरणे,सह अनेक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती,

सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

महाआरोग्य शिबिरात 1100 रुग्णांनी घेतला लाभ


सुशील भगत मानोरा प्रतिनिधी: तालुकातील वाईगौळ येथील तपस्वी संथ काशिनाथबाबा समाधी सोहळ्याचे औचित्त्या साधून यवतमाळ येथील राठोड यांनी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या आरोग्य शिबिरात ११००रुग्णांनी लाभ घेतला शिबिराचे उदघाटन मानोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार रामकृष्ण मलघने यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड हे होते.विचार व्यक्त करताना मान्यवर म्हणाले की यवतमाळ येथील अनेक डाक्टर खेड्यात येऊन रुग्णाची सेवा करतात हि चांगली गोष्ट असून असे उपक्रम जास्तीत जास्त प्रमाणात राबविण्यात यावे .या शिबिरात डाक्टर वीरेंद्र राठोड ,डॉक्टर विजय कारंडे,डॉक्टर अर्चना राठोड,डॉक्टर भारत राठोड,डॉक्टर चैतन्य गुप्ते,डॉक्टर महेश चव्हाण ,डॉक्टर जय राठोड,डॉक्टर प्रशांत तामगाडगे,डॉक्टर रश्मी तामगाडगे,डॉक्टर निकिता चव्हाण ,डॉक्टर निशांत चव्हाण ,डॉक्टर विनय धाकटे,डॉक्टर दिनेश राठोड,डॉक्टर मनीष राठोड,डॉक्टर सुधाकर जिरवनकर,डॉक्टर महेंद्र चव्हाण,यांनी मार्गदर्शन रुग्णांना केले ,शिबिरात गरीब गरजू रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली,तसेच कार्यक्रमाचे संयोजक अभय राठोड वाईगौळ यांनी 165 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशवितेसाठी अभय राठोड,उमेश राठोड,राजू गुल्लाने,श्याम राठोड,नितीन राठोड,महादेव जाधव,मनोज राठोड,अशोक चव्हाण,संजय राठोड,नीलकंठ राठोड,संघटना यवतमाळ व समस्त नागरिक वाईगौळ यांनी विशेष परिश्रम घेतले
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

प्रलंबित शिष्यवृत्ती मागणीचे उपोषण पीआरसीच्या आश्वासनाने मागे


वाशिम : जिल्हयातील भटक्या व मागासवर्गीय जातीमधुन उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती मिळण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर युवकांनी सुरु केलेले उपोषण पंचायत राज समिती अध्यक्ष व सदस्यांच्या आश्वासनामुळे 19 जानेवारी रोजी मागे घेतले. याबाबत 18 जानेवारी रोजी वंजारी सेवा संघ व युवकांनी निवेदन दिले होते.
    यावेळी उपोषणादरम्यान पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार पारवे व इतर सदस्यांनी उपोषणस्थळाला भेट देवून उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेवून कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच समाजकल्याण उपायुक्त श्री मुसळे यांनी उपोषणकत्यार्र्ंना लेखी पत्र देवून लवकरात लवकर कार्यवाहीचे आश्वासन दिले.
    याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले होते की, सन 2016-17 व सन 2017-18 ची वार्षिक शिष्यवृत्ती उच्च शिक्षण घेणार्‍या जिल्हयातील भटके विमुक्त व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अद्यापही न मिळाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. त्यामुळे सदरची प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. सदर उपोषणामध्ये वंजारी सेवा संघाचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल गंगावने, निलेश जाधव, विशाल नरवाडे, मनिष जाधव, रामु मुधळकर, विजय आपोतीकर, विजय कुलकर्णी, कौस्तुभ देशमुख, पवन जाधव, परिंदसाई चव्हाण, नितीन जाधव, अक्षय राऊत, पवन राऊत, विशाल नरवाडे, विजय वाघ, आदिनाथ बोंदार्डे, वृषभ मनटकर, मोहन गिराडे, रामेश्वर चव्हाण, पवन धांडे, अंकुश राठोड, उमेश अांधळे, जगदीश चौधरी, शिवाणी चोपडे, मेघा वानखेडे, वैष्णवी चतरे, भाग्यश्री गोरे, दिव्या राठोड, सोनाली गोंडे, दिप्ता मनवर, शुभदा मठपती, मृणाली आमटे, किरण राठोड आदी युवक व युवतींनी सहभाग घेतला. सदर उपोषणाला विविध राजकीय पक्ष व सामाजीक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी भेट देवून आपला पाठींबा दिला.

सम्राट टाइम्स मीडिया

निसार खान यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड



प्रतिनिधी । कारंजा 

       कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समितीच्या निवडणुकीत स्विकृत नगर सेवक व भारिपचे सक्रिय कार्यकर्ता निसार खान नजीर खान यांची स्थायी समिती सदस्य पदी अविरोध निवड करण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष हाजी मो.यूसुफ पुंजानी यांनी निसार खान यांच्या कार्याची दखल घेऊन डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची निवड केली होती.व नुकतेच त्यांनी आपल्या पक्षाचे गटनेते फिरोज शेकूवाले यांच्या मार्फत त्यांच्या नावाला शिक्कामोर्तब केले व सभागृहात त्यांची अविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

शांतता प्रस्थापित करायची असेल त्यासाठी भ्रष्टाचार रोखणे हे खूप गरजेचे : मौलाना एजाज असलम

          रिसोड : देशात भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे मजुरांसोबत अन्याय होत आहे. ज्या ठिकाणी अन्याय होत असेल भ्रष्टाचार होत असेल त्या ठिकाणी शांती नांदणे शक्य नाही. जर देशाला प्रगतीकडे न्यायचे असेल व शांतता प्रस्थापित करायची असेल त्यासाठी भ्रष्टाचार रोखणे हे खूप गरजेचे आहे.यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी देशात विचार करणे गरजेचे आहे.असे जमाते इस्लामी हिंद चे केंद्रीय सदस्य मौलाना एजाज अस्लम यांनी म्हटले.ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. जमात-ए-इस्लामी च्या वतीने 12 ते 21 जानेवारी दरम्यान शांती प्रगती व मुक्ती या विषयावर राज्य भर अभियान चालविले जात आहे. त्याअनुषंगाने 18 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता येथील चांदणी चौकात शिवलाल शर्मा यांचे जागेत जमात-ए-इस्लामी हिंद रिसोड च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार औरंगाबाद येथिल नौशाद उस्मान,नगर अध्यक्षा भारतीताई क्षिरसागर, तहसीलदार राजेंद्र सुरडकर,पत्रकार पी डी पाटील, शिव लाल शर्मा,मोहिम चे समन्वयक अब्दुल मोहसीन, पत्रकार दीपक कुदळे,सचिन देशमुख,राजयोगिनी ब्रम्हाकुमारी ज्योति दीदी,अशोक कुलाळ मंचावर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार राजेंश सुरडकर, सचिन देशमुख, नौशाद उस्मान, ब्रह्मकुमारी जोति दिदी,भारती ताइ,शिरसागर यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाची प्रस्तावना अब्दुल मोहसीन यांनी केली कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद जुनेद यांनी केले तर आभारप्रदर्शन शेख वकार यांनी केले.दरम्यान कार्यक्रमातील मंचावर उपस्थित मान्यवरांचे कुराण ग्रंथाच्या मराठी भाषेतील प्रत देउन स्वागत सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाला अरुण क्षीरसागर,शेख शब्बीर,बब्बू पेंटर,विजय बोरकर,इरफान कुरैशी, प्रदीप खंडारे,शेख जुल्फिकार, नाथूराम मेहता, रवि अंभोरे,राजकुमार गाडे, रियाज पठान, चाफेश्वर गांगवे,गोपाल खडसे पाटिल, दिनकर बोडखे,फैयाज अहमद, मुनव्वर खत्री,संजय पवार, श्यामसुंदर मुदंडा,प्रा भिसडे,नागप्पा चवरे,शेख खाजा,अशोक भाई नीचड, भागवत घुगे,बिलाल खान,अबरार खान,पंकज मुंदडा, अब्दुल तस्लीम, रामकिशन दवंड,संजय पवार अन्य नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्विते करिता जमाते इस्लामी हिंद च्या सदस्यांनी मेहनत केली.
   महेंद्रकुमार महाजन जैन 9960292121

सुक्ष्म सिंचन योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज करणेसाठी अंतिम मुदत 15 मार्च



वाशिम, दि. १९ : प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना अंतर्गत सुक्ष्म सिंचन योजना सन २०१७-१८ करीता लाभ घेण्यात इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांकडून ई-ठिबक प्रणालीवर ऑनलाईन अर्जासाठीची अंतिम मुदत दिनांक १५ मार्च २०१८ आहे.तसेच दि. १५ मार्च २०१८ पर्यंत प्राप्त होणाऱ्या अर्जांना दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत पुर्वसंमती देण्यात येईल. सदर यादी सन २०१८-१९ या वर्षात पुढे ओढण्यात येईल. पुर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांना दि. ३१ मे २०१८ पर्यंत सुक्ष्म सिंचन संचाची उभारणी करणे बंधनकारक राहील. जे शेतकरी दि. ३१ मे २०१८  पर्यंत सुक्ष्म सिंचन संचाची उभारणी करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची नावे सन २०१८-१९ च्या पुढे ओढण्यात आलेल्या यादीतून वगळण्यात येतील. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

सम्राट टाइम्स मीडिया