बळीराजा झाला पुरता हैरान
कृषी विभागाने वेळीच नियोजन करन्याची गरज
मंगरुळपीर:- तालुक्यातील शेतकरयांवर कापसावरील बोंडअळीनंतर हरभरा पिकांवर आलेल्या घाट अळीचा संकट उभे राहिले आहे. या मंगरूळपीर तालुक्यातील शेतकर्यांवर बोंडअळीनंतर घाटेअळीचे संकट देन्याची गरज आहे.त्याच बरोबर सोयाबीन वर करप्या रोग पडला आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. यंदा सुरुवातीला कापसाचे पीक बहारुन आल्याने शेतकरयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र, हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पहिल्या, दुसरया वेचणीनंतर कापसावर बोंडअळीने हल्ला चढविला. त्यामुळे शेतकरयांचे अल्पावधीत होत्याचे नव्हते झाले. कापसाचे पीक तांबडया अळीने खाल्ल्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. खरीपाचे नुकसान रब्बीत भरुन काढू असा विचार करून अनेक शेतकरयांनी हरभराची पेरणी केली. हे पीक चांगले उतरले. ऐन घाटयात असतानाच निसर्गाचा लहरीपणा सुरु झाला. ढगाळ वातावरणामुळे हरभरयावर घाट अळीचे संकट उभे राहिले. बिकट परिस्थितीवर मात करून शेतकरी वाट काढत असला तरी संकट मात्र त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. हरभरयाला लागलेली फुले व घाटे टिकलण्यासाठी शेतकरी जीवतोड प्रयत्न करीत आहे. आता पर्यंत औषधांचा मोठा खर्च झाला आहे. बोंड आळी नंतर घाट आळीचे संकट आल्याने पिकावर लावलेला खर्चही निघतो की नाही हा प्रश्न आता उभा राहिला आहे. अनेक ठिकाणी हरभरा हिरवागार दिसतो. मित्र घाटयांना आळयांनी पोखरल्याने उत्पन्न झिरो झाले आहे.
सध्या घाटेअळी आर्थीक नूकसान पातळीच्या खाली असुन शेतकर्यांनी घाबरन्याचे कारण नाही तरीही आंतरप्रवाही किटकनाशके फवारुन घाटेअळी नष्ट करु शकता.
सचिन कांबळे
तालुका कृषी अधिकारी,मंगरुळपीर जि.वाशिम
,सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा