रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

साप$$$ साप $$$ कर्मचाऱ्याची शौचालयात गोची


सम्राट टाइम्स 
साप दिसताच चांगल्या चांगल्याची बोबडी वळते . साप कोणत्या क्षणी कोणत्या ठिकाणी दिसेल याचा नेम नाही .पण जोराची शोच लागली अन साप दरवाजावर ठाण मांडून बसला तर ......
किन्हीराजा ग्रामपंचायचे शौचालय.... वेळ सकाळी 9 वाजता.... ग्राम पंचायत कर्मचारी लगबगीने शौचालयात जायला निघाला. शौचालयाचा दरवाजा उघडताच साप दरवाजावर फणी काडून बसलेला दिसताच ग्राम पंचायत कर्मचाऱ्या ची बोबडीच वळली साप $$$
साप$$ म्हणत  कर्मचाऱ्याने किंकाळी फोडली .जोराची शोच लागलेली... दरवाजावर साप बसलेला ...जीवाचा थरकाप उडालेला ....ग्राम पंचायत कर्मचाऱ्याची फजिती झाली .ग्राम पंचायत कर्मचाऱ्याची किंकाळी ऐकून गावकरी गोळा झाले पाहतात तर शौचालयांच्या दरवाजावर साप फणी काढून बसलेला  सापला हुसकविण्याचा प्रयत्न करतात साप फणी काढून  फुत्कारात असलयाने सर्व ग्रामस्थ भयभीत झाले 
किन्हीराजा ग्रामपंचायत कारभार ठेपाल्याने गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे गावाला विकृत मानसिकतेची खरूज लागली आहे गावाचं विकास खुंटला आहे मालेगाव तालुक्यात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत घाणीच्या विळख्यात सापडली आहे परिसरात सर्वत्र घाणीचे  साम्राज्य पसरल्याने ग्रामपंचायत परिसरात सरपटणारे प्राणी नजरेस पडत आहे घाणीमुळेच साप ग्रामपंचायतच्या शौचालयात घुसला कर्मचारी परिसर स्वच्छ करत नसल्यानेच ग्राम पंचायत कर्मचाऱ्या वर फजितीचा प्रसंग ओढवल्याचे गावकरी बोलत आहेत 
सम्राट टाइम्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा