पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळासम्राट टाइम्स लाईव्ह
राज्यातील पत्रकारांना स्वयंभु बनविण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जर्नालिस्ट वृत्तवाहिनी स्टुडिओचे उद्घाटन सोहळा आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी दिली.हा सोहळा सोमवारी 27 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11.30 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कर्वे रोड येथील सिध्दार्थ हॉल येथे जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, राज्याचे महसुलमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व जेष्ठ पत्रकार विजय बावीस्कर, प्रमुख पाहुणे संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, कार्याध्यक्ष वसंत मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.यावेळी जर्नालिझम कोर्सच्या उद्घाटनचा शुभारंभ होवून पत्रकारांचा यथोचित सत्कार सोहळा, पुरस्कार वितरण सोहळा व नवीन पदाधिकार्यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.यावेळी पत्रकारीता क्षेत्रातील अनिलजी भापकर औरंगाबाद, प्रा. सी. एन. चौधरी जळगाव, आशिष घुमे वरोरा जि. चंद्रपुर, सोमनाथ काळे संगमनेर तसेच शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे संतोष लक्ष्मण सदगीर अहमदनगर, प्रा. आनंद सुराणा बुलढाणा, उत्कृष्ट अभियंता त्र्यंबक लक्ष्मण राऊत अहमदनगर आदिंना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.म. रा. मराठी पत्रकार संघाचे वृत्तवाहीनी संघाचे अध्यक्ष मनिष केत, मुंबई अध्यक्ष संजय माळवदे, प्रदेश उपाध्यक्ष रणधीर कांबळे, विजय वाघमारे, राकेश टोळये, विजय वर्पे, सोमनाथ देशकर, ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, कुंदन जाधव, प्रदेश सरचिटणीस सुशील कुलकर्णी, कोकण विभागीय अध्यक्ष उपेंद्र बोर्हाडे, विदर्भ प्रमुख ईश्वरसिंग ठाकुर, नागपूर विभागप्रमुख व्यंकटेश दुधमवार, खानदेश विभागप्रमुख किशोर रायसाखडा, अमरावती विभागप्रमुख बाळासाहेब देशमुख, प्रदेश कार्यकारीणी सदस्य हरिष यमगर, दिपक कांबळे, सुभाष डोके, सुरेखा खानोरे, मंत्रालय संपर्क प्रमुख खंडुराज गायकवाड, नितीन तोरसेकर आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी यावेळी राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुणे येथे जर्नालिस्ट कोर्सेसचा शुभारंभ पार पडणार आहे. तसेच राज्यातील नवीन निवड झालेल्या पदाधिकार्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. तरी या सोहळयास सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, पुणे शहर जिल्हाध्यक्ष किरण जोशी आदींनी केले आहे.सम्राट टाइम्स लाईव्ह
आता कुठलीही बातमी दबणार नाही,कारण आता आला आहे सत्याचा खणखणीत आवाज माध्यमांचा सम्राट.........
शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७
राज्य पत्रकार संघाच्या वृत्तवाहिनीचे उद्या उद्घाटन*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा