सम्राट टाइम्स लाईव्ह
वाशीम - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार शिरपूर जैन येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक व सामाजीक बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष अमोल देशपांडे यांना मिळाला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव परिषदेमध्ये गुरुवार, 16 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या भव्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानी गुणीजन परिवार प्रणेते व संस्थापक अध्यक्ष के.एल. गोगावले, कार्याध्यक्ष प्रकाश सावंत, इन्फोटेक फिचर्स इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यवस्थापक अमोल सुपेकर, राष्ट्रीय किर्तनकार हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांची प्रमुख उपस्थिती होती. कला, क्रीडा, पर्यावरण, सांस्कृतीक क्षेत्रात देशपांडे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते महावस्त्र, सन्मान पदक, मानपत्र देवून गौरविण्यात आले. देशपांडे यांना याआधी मातंग समाज सद्भावना मित्रमंडळ औरंगाबादचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजसेवी पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आदर्श शिक्षक विष्णूपंत देशपांडे यांचे सुपुत्र व शिरपूर सारख्या ग्रामीण भागात राहून सामाजीक कार्य करणारे अमोल देशपांडे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा