सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

माहूर तालुक्यातील वरचा पवनाळा येथे विज पडून पति-पत्नी गंभीर.


माहूर (प्रतिनिधी )माहूर पासून दक्षिणेस 20 कि. मी.अंतरावर असलेल्या वरचा पवनाळा येथे आज दि.9 ऑक्टो.रोजी दुपारी  4 वाजण्याचे सुमारास विज अंगावर पडून बाबाराव रामराव फड (60 ),व त्यांची पत्नी चंद्बारभागाई बाबाराव फड (55 ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले,तिथे त्यांचेवर प्राथमिक इलाज करून त्यांना तात्काळ यवतमाळ येथे हलविण्यात आले,दोघांचीही प्रकृति नाजुक आहे.तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी तात्काळ रूग्णालयात भेट देऊन जखमीची विचार पूस केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा