सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

मोप येथील राममंदिराचा जिर्णोध्दार !!


                   
  रिसोड तालुक्यातील बऱ्याच खेड्याशी जोडलेले मोप हे गांव औरंगाबाद वाशीम मेनरोडवर आहे.दगडावर कोरीव काम करुन आकर्षक मुर्ती बनविण्यासाठी सुद्धा मोप  हे गाव प्राचीन काळापासुन प्रसिद्ध आहे. या गावाला जवळपास बरीच खेडी जोडण्यात आलेली आहे.नेहमी वर्दळ राहते. 
ग्रामीण भागातील गावाचा प्राचीन इतिहास जाणुन घेण्यासाठी आपल्याला मंदिराचा आधार घ्यावा लागतो.  
                                 रिसोड तालुक्यातील मोप या गावचे ग्रामदैवत श्री. कुमारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे.हे मंदिर प्राचीन असल्यामुळे मोप गाव प्राचीन काळातील असल्याचे सिद्ध होते.गावचे ग्रामदैवत  श्री.कुमारेश्वराच्या मंदिराला लागुनच प्राचीन सिकची परिवाराने स्थापन केलेले राम मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम सध्या जोरात सुरु आहे.सर्व सोयीसुविधा युक्त प्रशस्त अशा मंदिराचे काम प्रगती पथावर असुन लवकरच श्रीराम मुर्तिची प्रतिस्थापना व मंदिराच्या सुशोभित कळसाचे काम लवकरच पुर्ण होणार असल्याची माहीती मा.डाॅ.गोपिकिसन सिकची साहेब यांनी दिली

महेंद्रकुमार महाजन जैन
 रिसोड
9960292121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा