शंकरासारख्या माणसामुळे प्रमाणिकपणा जिवंत : विजयराव जाधव
ग्राहकाची सोन्याची पोथ केली परत
नंदकिशोर वनस्कर
मालेगाव शहरातील सायकल दुरूस्तीचे काम करणार्या शंकर सुडके यांनी ग्राहकाच्या न कळत त्यांच्या दुकानात पडलेली सोन्याची पोथ त्या ग्रहकाच्या घरी जावुन परत केल्याने शंकर सुडके यांचा प्रमाणिकपणा दिसुन आला.
मालेगाव शहरातील शंकर सुडके यांचे जुने बस स्थानक परिसरात अनेक वर्षापासुन जयभोले सायकल स्टोअर्स नावाने सायकल दुरूस्तीचे दुकान आहे. या दुकानात दिवसभर काम करून आपल्या कुंटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मालेगाव तालुक्यात नाही तर वाशीम जिल्हात प्रसिध्द सायकल दुरूस्तीचे दुकान आहे. शंकर सुडके यांचा सायकल दुरूस्तीचा व्यवसाय वडिलोपार्जीत असल्याने ते सुध्दा हा व्यवसाय करत आहेत. गुरूवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या दुकानावर आपल्या सायकलचे पंचर काढण्यासाठी आले. पंचरचे पैसे काढतांना त्याच्या खिशातुन एका पुडीत बंद असलेली अंदाजे पंधरा हजार रूपये किंमतीची सोन्याची पोथ त्यांच्या न कळत पडली व ते ग्राहक तेथुन निंघुन गेले. मात्र आपल्या कामात व्यस्त असलेले शंकर सुडके यांचे लक्ष त्याकडे गेले व पाहले तर त्यात सोन्याची पोथ होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या ग्राहकाचा शोध घेवुन ति पोथ त्या ग्रहकास परत केली. अशाप्रकारे शंकर सुडके यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय दिला. या प्रामाणिकपणाबद्दल शंकर सुडके यांचा माजी आमदार विजयराव जाधव याच्या हस्ते शाल व श्रीफळ देवुन भाजपाच्यावतीने त्यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी बालतांना माजी आमदार विजयराव जाधव म्हणाले की, शंकर सुडके यांनी त्या ग्राहकाची सोन्याची पोथ परत करून माणसामध्ये प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवुन दिले.
शंकर सुडके यांच्या आजच्या प्रकारामुळे त्यांचे वडिल स्व. भगवानराव सुडके यांनी आपल्या मुलावर केलेले संस्कार दिसुन आले. त्यांनी केलेल्या संस्कारामुळेच शंकर सुडके यांनी त्या ग्राहकाची पडलेल्या सोन्याची पोथ क्षणाचाही विलंब न लावता कोणत्याही प्रकारचा मोह न करता परत दिली. आजच्या युगात शंकर सुडके माणसामुळे प्रमाणिकपणा जिवंत आहे. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष तानाजी पवार, जिप सदस्य शंकरराव बोरकर, जिल्हा सरचिटणीस संदीप पिंपळकर, तालुका सरचिटणीस दिपक आसरकर, मालेगाव नगर पंचायतचे भाजपाचे नगरसेवक किशोर महाकाळ, बाबुराव जाधव, प्रा.आनंद देवळे, वसंतराव घुगे, कैलासराव घुगे, किरण चांगाडे, संजय केकन, मणोज काबरा, विश्वासराव बोरकर, भाजपा युवा मोर्चाचे मालेगाव शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काटेकर, उपाध्यक्ष नंदु यादव सह आदी कार्यकर्तांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा