आधुनिक शेती व उद्योगातून साधला जातो आर्थिक विकास - गोविंद डाके
विनोद तायडे वाशिम प्रतिनिधी
वाशीम - आज छोट्या छोट्या बाबींमधूनही आपण पैसे कमावू शकतो. मात्र त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेती व उद्योगात केला तर त्यातून आपला आर्थिक विकास साधला जाते. लघुउद्योजकांनी या तंत्रज्ञानाचा आपल्या उद्योग व शेतीउद्योगामध्ये उपयोग करावा असे मत अखिल भारतीय माळी महासंघ उद्योजक आघाडीचे राज्य अध्यक्ष गोविंद सुमन केशव डाके यांनी केले.
स्थानिक लाखाळा येथील महात्मा फुले लॉनमध्ये 9 सप्टेंबर रोजी उद्योजक व्यवसायीकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालरोग तज्ञ डॉ. विजय कानडे हे होते. तर मंचावर उद्योजक अनिल केंदळे, सत्यशोधक विचारवंत डॉ. रवी जाधव, अ.भा. माळी महासंघाचे मार्गदर्शक श्रीकृष्ण बोळे, विशाल इंगोले, आनंदराव पिंजरकर, अकोला अर्बनचे संचालक प्रकाश भांदुर्गे, अॅड. गवळी, वानखेडे, सौ. मिना बगाडे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी महासंघ जिल्हा शाखेच्या वतीने डाके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डाके यांनी विविध उद्योगाची सखोल माहिती दिली. ते म्हणाले की, आपण शेती करतो त्या शेतीमध्ये कोणतीही वस्तु वाया जात नाही. सर्व वस्तु विकल्या जातात. शेती आधुनिक पध्दतीने व प्रयोगात्मकरित्या वापर करुन केली तर त्यातून आपण निश्चितपणे आपला आर्थिक विकास साधू शकतो. अनेक शेतकरी सोयाबीन पेरतांना जवळजवळ झाडे पेरतात. त्यामुळे पिक कमी येते. त्यामुळे प्रत्येक सोयाबीनच्या झाडात किमान 9 इंचाचा फरक ठेवल्यास आधी येणार्या 15 टक्के पिकापेक्षा 75 टक्के पिक जास्त येते. सांबाराची शेती करतांना दररोज एक ओळ पेरुन त्याला पाण्याचे भिजवन न देता केवळ पाण्याची फवारणी जरी केली तरी तुमचे पिक मुबलक येते. आपण फुले दुरुन दुरुन आणतो त्यापेक्षा अर्ध्या एकरामध्ये मी सांगीतले तशी फुलांची झाडे लावली तर आधी दहा रुपये किमत असणार्या फुलांची पन्नास रुपयाने बाहेरगावात फुले विकल्या जातात. बरेच लोकांना माहित नसेल की वाशीममधून सर्वात जास्त डाळींबाची पिके बाहेरगावात निर्यात केली जातात. महिलांनाही यशस्वी उद्योजक होता येते. त्यासाठी महिलांनी आपले घरकाम आटोपून कुरड्या, पापड तयार करुन मला पाठवावे. मी त्याचा जास्तीत जास्त भाव देईल. सलग तीन तास डाके यांनी उसंत न खाता महिला व पुरुषांना विविध उदाहरणे देवून उद्योगांची माहिती देवून आपली उर्जा इतर कामात खर्ची न घालता उद्योगधंद्यात घालावी असे आवाहन करत नवउद्योजकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डाके यांनी राज्य संघटीकासौ. किरण गिर्हे, जिल्हाध्यक्ष गजानन ठेंगडे, महिला अध्यक्ष सौ. पूजा उलेमाले, उपाध्यक्ष सुनील जाधव, प्रशांत भडके, अमर जाधव, सचिव रूपेश भोसले, देवा वानखेडे, राज्य सदस्य नागेश काळे, शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, डॉ. प्रमुख पावसे, गोलू इंगोले, योगेश उलेमाले, मंकेश माळी, नथ्थुजी राऊत, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त अनिल धुळे, राष्ट्रीय खेळाडू नारायण ठेंगडे, उद्योजक वैभव उलेमाले यांच्या कार्याचे कौतुक केले. समाधान गिर्हे यांनी डाके यांना संविधान पुस्तिका भेट दिली.
कार्यक्रमाचे संचलन सौ. किरण गिर्हे यांनी तर आभार नारायणी कलेक्शनचे मालक योगेश उलेमाले यांनी मानले. कार्यक्रमाला शिवसेना नेते गजानन जोगदंड, उमेश मोहळे, नंदू उलेमाले, श्रीराम हजारे, तालुकाध्यक्ष वैभव इंगोलकर, अधिकारी प्रमुख पंकज उलेमाले, उद्योजक अतुल इंगोले, तालुकाध्यक्ष अशोक राऊत, गणेश गाभणे, प्रभाकर वानखेडे, प्रवीण उलेमाले, गजानन राऊत, रवि इंगोले, संभाजी साळसुन्दर, सत्यशोधक जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, उद्योजक गोपाल जाधव, संदीप वानखेडे, मदन पिंजरकर, अमोल सुरुसे, संतोष वानखेडे, विशाल भांदुर्गे, राजु इंगळे, दिलीप जाधव, संतोष इंगोले, जेष्ठ पत्रकार मंगल इंगोले, देवानंद खडसे, संतोष गडेकर, सचिव सौ. रेखा राऊत, सौ. छाया भांदुर्गे, सौ. मेघाताई इंगळे, सौ. मडके, सौ. रेणुका भांदुर्गे, सौ. अनीता इंगोले, सौ. अलका धामणकर, सौ. अलका गिर्हे, सौ. विणा पिंपळकर या सह माळी युवा मंच, माळी कर्मचारी सेवा मंडळ, सावित्री महिला मंचचे सर्व पदाधिकारी, अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा