सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

उमरगा गांधी व शास्त्री जयंती साजरी



हुकमत मुलाणी
उस्मानाबाद


 म .  गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान उपक्रम अंतर्गत अखिल भारतीय मारवाडी युवा मंच शाखा उमरगा यांच्या वतीने सोमवारी  उमरगा बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी मारवाडी युवा मंचचे शाखा अध्यक्ष मनीष सोनी, माहेश्वरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसाद चांडक, अँड. प्रविणचंद्र तोतला,  तालुका सचिव शिवप्रसाद लड्डा, शहराध्यक्ष राजगोपाल काबरा, ओमप्रकाश लड्डा, आगार व्यवस्थापक एम. आर. कांबळे उपस्थित होते.

 यावेळी बस स्थानकावर येणाऱ्या सर्व प्रवासी, नागरिक यांना आपले परिसर, जागा, घर, बस स्थानक व इतर सार्वजनिक  ठिकाणी स्वच्छता  ठेवण्याचे आवाहनकरण्यात आले.

बस स्थानक स्वच्छ रहावे यासाठी बस स्थानक फलाट वर कचरा कुंडी बसविण्यात आल्या.

यावेळी लक्ष्मीकांत सोमाणी, जुगलकिशोर खंडेलवाल, शितल लड्डा, किशोर काबरा, दिपक लाहोटी, रामेश्वर सोमाणी, संजय लड्डा, अमोल गिल्डा, सचिन मोदाणी, रामेश्वर जाखोटिया ,  के. आर. टेकाळे , डी. बी. खंडागळे, श्रेयश लड्डा, आदीसह बस स्थानक कर्मचारी, समाज बांधव उपस्थित होते.


हुकमत मुलाणी
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा