सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

नेहरू युवा मंडळाकडून विजेत्यांना सन्मानपत्र प्रदान




सम्राट टाइम्स न्यूज

वाशिम- आज दि 2 रोजी  सकाळी 8 वाजता   ग्राम केकतउमरा येथे 15 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर या  कालावधी दरम्यान स्वछ पंधरवाडा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी संपुर्ण गांवातुन प्रभात फेरी काढण्यात आली.याकालावधीत स्वछतेवर निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा ,शुद्धलेखन स्पर्धा , शौचालय जनजागृती रैली असे विविध उपक्रम या शाळेच्या वतीने व नेहरू युवा बहुउद्देशिय मंडळाच्या पुढांकाराने हे उपक्रम राबविण्यात आले.आज या पंधरवाडा कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला नेहरू युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार द्धवारा सलग्नित नेहरू युवा मंडळ च्या वतीने सन्मान पत्र देण्यात आले.व त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर वाठ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर , केंद्रप्रमुख रा.भी दंडे  ,पदवीधर शिक्षक उमेश देशपांडे हे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्र्पिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जिवन कार्यावर कु दिपाली कुर्हे , कु ,  प्रदण्या गोपीचंद पडघाण, अंजली पट्टेबहादुर,शुभम दिनेश पट्टेबहादुर,अदित्य संतोष पट्टेबहादुर,  कु वैष्णवी वाठ, कु तनुजा पट्टेबहादुर शिवा पाचांगे इत्यादि अनेक जणांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. यावेळी उमेश देशपांडे यांनी विद्यार्थी यांना मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि,स्वछता आपल्या अंगी असणे फार गरजेचे आहे,म्हणून आपण दररोज आपले घर,परिसर ,शाळा हा नेहमी स्वछ ठेवला पाहिजे. म्हणजे आपले आरोग्य हे एक निरोगी राहील असे मोलाचे विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना प्रविण पट्टेबहादुर म्हणाले कि , नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या माध्यमातुन आम्ही ग्रामीण भागात विविध विषयावर कार्यशाळा घेवून येथील युवकांना विविध क्षेत्राची माहीती देवून त्यांना विविध प्रशिक्षण देवून त्यांचा विकास साधन्याच्या संधी उपलब्ध करूंन देत असतो.म्हणून विद्यार्थी दशेत असतांनाच आपण अभ्यास केला पाहिजे . महापुरुषाचे विचार वाचले पाहिजे,विविध स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. असे मौलिक विचार व्यक्त केले. रा . भि. दंडे यांनी विद्यार्त्याला प्रश्न विचारुण त्यांच्या सोबत हितगुज करूंन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.यावेळी उपस्थित शिक्षक देवबा शिंदे ,रामकिसन वाकुड़कर मापारी सर रामेश्वर पाचंगे  घुगरे ,  वानखेडे मैडम कावळे मैडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक रामेश्वर पाचंगे यांनी केले तर आभार कु.सुषमा पट्टेबहादुर हिने मानले.

सम्राट टाइम्स 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा