सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

मनातील रावणाचे दहन करा - देवी वैभवीश्रीजीश्री हनुमान रामकथेचे प्रथम पुष्प
सम्राट टाइम्स न्यूज

 स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहूरवेस येथील ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिराचे जिर्णोध्दार व पुन:स्थापना निमीत्त बाहेती परिवाराच्या वतीने श्री श्री रविशंकर यांची कृपापात्र शिष्या देवी वैभवीश्रीजी यांनी अमृतवाणीतून 1 ऑक्टोंबर रोजी श्री हनुमान रामकथेच्या प्रथम पुष्पात मार्गदर्शन करतांना केवळ विजयादशमी निमित्त रावणाचे पुतळे जाळून भागणार नाही. तर मनातील रावणाचे दहन करावे असे आवाहन त्यांनी केले.
    स्थानिक शुक्रवारपेठ येथील ज्ञानगंगा परिसरात बोलतांना देवी वैभवश्रीजींनी पुढे सांगीतले की, रावणाचे अनेक प्रकार आहेत. मोह, माया, मत्सर, व्देष हे सुध्दा प्रकार असून याचा प्रत्येकाने त्याग करणे जरुरी आहे. जो व्यक्ती मान, अपमानाच्या भावनेतून बाहेर पडतो तोच खरा रामभक्त ठरतो. रावणाचा खरा अर्थ हिंसक प्रवृत्ती. हत्या करण्याची प्रवृत्ती आहे. तर हनुमानाचा अर्थ भक्ती प्राप्त करणे आहे. भजन, भक्तीस्वरुप भरत आहे. आत्म्याची तृप्ती जिथे होते तो भरत आहे. भरताने राज्य मिळाल्यानंतरही रामाची पादुका घेवून 14 वर्ष राज्य चालविले. राम, लक्ष्मण, हनुमान, भरत हे खरे आदर्श आहेत. असे त्यांनी सांगीतले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ. हरिष बाहेती, डॉ. सौ. सरोज बाहेती, जमनादास बाहेती, सनदी लेखापाल बालकिसन बाहेती, डॉ. जयकिसन बाहेती, प्रविण बाहेती,  राम बाहेती, गुड्डु बाहेती, व्दारकादास बाहेती, संदीप बाहेती यांनी परिश्रम घेतले.
    मंगळवार 3 ऑक्टोंबरला दुपारी 12 ते सायंकाळी 7 पर्यंत रोकडीया हनुमान प्रभातफेरी मंडळ शेलू यांच्या सानिध्यात संगीतमय 108 श्रीहनुमान चालिसापाठचे आयोजन करण्यात आलेले आहे. गुरूवार 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत जिर्णोध्दार व पुन:स्थापना, दुपारी 1 ते 4 महाप्रसाद व सायंकाळी 7 वाजेपासून महारास सत्संग, ध्यानज्ञानचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचा भाविकभक्तांनी  मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक बाहेती परिवाराने केले आहे.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा